रविवार, ऑक्टोबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘मुलगी झाली हो’ मालिकेतून या अभिनेत्याची एक्झिट

सप्टेंबर 28, 2022 | 5:06 am
in मनोरंजन
0
Mulgi Zali Ho

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – स्टार प्रवाहवरील अनेक मालिका लोकप्रिय आहेत. लोकांना आवडतील असे असले तरी वेगळे विषय घेऊन या मालिका बेतलेल्या असतात. त्यामुळेच अल्पावधीतच ही वाहिनी तगडी प्रतिस्पर्धी म्हणून उभी राहिली. याच वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेमुळे यातील कलाकारांना ओळख मिळाली आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे. ही मालिका कधी निरोप घेईल हे माहीत नाही, पण या मालिकेत एसीपी सिद्धांत ही भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ खिरीड हा लवकरच या मालिकेतून एक्झिट घेणार आहे. नुकतीच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने या मालिकेतून लवकरच निरोप घेण्याबद्दल सांगितले आहे.

अभिनेता सिद्धार्थ खिरीड हा सोशल मीडियावर फारच सक्रिय असतो. तो नेहमीच विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतीच त्याने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेबद्दल एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या मालिकेत त्याने एसीपी सिद्धांत ही भूमिका साकारली आहे. या मालिकेच्या शूटिंगचा त्याचा शेवटचा दिवस होता. या निमित्ताने त्याने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. आणि त्याला त्याने भावूक कॅप्शनही दिले आहे.

‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील एसीपी सिद्धांत या पात्राला माझा निरोप. या भूमिकेने मला आनंद दिला आणि लोकांचे अपार प्रेम दिले. या भूमिकेने या मालिकेतून एक्झिट घेऊन दोन महिने झाले आहेत. पण जेव्हा मी याबद्दलचे मेसेज, कमेंट्स पोस्ट वाचतो तेव्हा मला फार छान वाटते. या शोमध्ये माझी पुन्हा एंट्री झाली. हे पात्र विरोधी असले तरी लोक त्या पात्राची अजूनही आठवण काढतात याबद्दल मला खरंच फार कौतुक वाटतं, असं सिद्धार्थ सांगतो.

स्टार प्रवाह आणि पॅनरोमो इंटरटेनमेंट यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल त्याने त्यांचे आभार मानले आहेत. लेखक, दिग्दर्शक, डीओपी, लाईट दादा, स्पॉट दादा, कॉस्च्युम, माझे सर्व स्क्रीन कलाकार, प्रेक्षक, फॅन पेज आणि या प्रोजेक्टशी जोडलेल्या प्रत्येकाचे खूप खूप आभार…. एसीपी सिद्धांत भोसलेचा अखरेचा नमस्कार”, असा इमोशनल निरोप सिद्धार्थने घेतला आहे. सिद्धार्थच्या या पोस्टवर नेहमीप्रमाणेच अनेकांच्या कमेंट आल्या आहेत. ‘कुठे पोहोचण्यासाठी कुठून तरी निघणे गरजेचे आहे’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने ‘लवकरच काहीतरी नवीन घेऊन आम्हाला भेटायला ये… आम्ही तुझी वाट बघतोय… मिस यू….लव्ह यू सो मच’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth Khirid (@siddharthkhirid)

Marathi TV Serial Mulgi Zali Ho Actor Exit
Entertainment Star Pravah

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये; असा आहे दौरा

Next Post

हे कपल सोशल मीडियावर व्हायरल; चाहते म्हणतात, ‘लग्नाची पत्रिका लवकर द्या’

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
Tejaswi Prakash Karan Kundra

हे कपल सोशल मीडियावर व्हायरल; चाहते म्हणतात, 'लग्नाची पत्रिका लवकर द्या'

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011