इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिने अभिनय क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. तर ‘बिग बॉस’ शो पासून तिला नावही मिळाले. याच शोपासून तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा चांगलेच चर्चेत आले आहेत. करण आणि तेजस्वी यांना सोबत पाहण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असल्याचे दिसते आहे.
सोशल मीडियावर तेजस्वी कायमच सक्रिय असते. नुकतेच तिने आपल्या इंस्टाग्रामवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तेजस्वीचा अत्यंत बोल्ड लूक दिसतोय. ते ती कायमच करत असते. यावेळी महत्त्वाची गोष्ट ही आहे की, तेजस्वीने हे सर्व फोटोशूट करण कुंद्रासोबत केले आहे. दोघांनीही फोटोंमध्ये अतिशय सुंदर पोज दिल्या असून चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडत आहेत. ‘बिग बाॅस’पासूनच लोकांना तेजस्वी आणि करणची जोडी प्रचंड आवडते. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर कायमच व्हायरल होतात.
करण आणि तेजस्वीचे रोमँटिक फोटो पाहून नेटकरी म्हणाले आता लग्नाची पत्रिका लवकर द्या. करण आणि तेजस्वी या दोघांचेही सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्यामुळे चाहते आता फक्त तेजस्वी आणि करणच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
Entertainment Karan Kundra Tejaswi Prakash Photos