India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मराठीसाठी ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

India Darpan by India Darpan
March 11, 2023
in राष्ट्रीय
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीसाठी ‘उजव्या सोंड्यांच्या बाहुल्या’ या कादंबरीला आज प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कादंबरीचे लेखक प्रवीण बांदेकर यांनी स्वीकारला.

येथील कमानी सभागृहात आज साहित्य अकादमी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या पुरस्कार अर्पण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे नामवंत साहित्यिक उपमन्यु चटर्जी, साहित्य अकादमीचे नवनियुक्त अध्यक्ष माधव कौशिक तसेच नवनियुक्त उपाध्यक्ष कुमुद शर्मा आणि सचिव के.श्रीनिवास राव यांच्यासह 24 भाषेतील पुरस्कारार्थी साहित्यीक व्यासपीठावर उपस्थित होते.

मराठी भाषेसाठी ‘उजव्या सोंड्याच्या बाहुल्या’ या प्रायोगिक कादंबरीला वर्ष 2022 चा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोंकणी भाषेसाठी माया खरंगटे यांना त्यांच्या कोकणी भाषेतील ‘अमृतवेळ ‘ या कादंबरीसाठी प्रदान करण्यात आला.

प्रवीण बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरी विषयी
उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही एक प्रायोगिक कादंबरी आहे. या कादंबरीचा विषय समकालीन संस्कृती वरच्या संकटाचे नाट्यमय चित्रण यात केलेले आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण भागात लोकप्रिय असलेल्या चित्रकथी सारख्या लोककला प्रकारांचा उत्कृष्ट वापर केल्याने कादंबरीचे कथन तंत्र नाविन्यपूर्ण झालेले आहे. कादंबरीत अधून मधून कोकणी आणि गोव्यातील बोलींच्या कलात्मक वापराने कादंबरीची कथनशैली समृद्ध झाली आहे. स्वतःची ओळख हरवून बसलेल्या विचारवंतांच्या नोस्टॅलीजीयाचे चित्रणअतिशय संवेदनशीलतेने केलेले आहे. या सर्व कथनामुळे उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही मराठी साहित्यकृती विशेष ठरली आहे.

मराठीतील सुप्रसिद्ध लेखक प्रवीण बांदेकर कवी समीक्षक आहेत त्यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झालेला आहे त्यांनी इंग्रजी व मराठी साहित्यात यांनी केले आहे ते सावंतवाडी येथील शासकीय कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पूर्वी त्यांच्या येरू म्हणे, चाळेगत, ,इंडियन ॲनिमल फार्म, चिनभिन असे साहित्य प्रकाशित झालेले आहे. श्री बांदेकर यांना महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, जैन फाउंडेशनचा ना.धों महानोर पुरस्कार इत्यादी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

Marathi Book Ujvya sondechya Bahulya Sahitya Akadmi Award


Previous Post

उद्यापासून असा आहे हवामानाचा अंदाज

Next Post

नाशकात याठिकाणी भरायचे अहिल्यादेवी होळकरांचे न्यायालय; १७व्या शतकात असे होते त्याचे वैशिष्ट्य…

Next Post

नाशकात याठिकाणी भरायचे अहिल्यादेवी होळकरांचे न्यायालय; १७व्या शतकात असे होते त्याचे वैशिष्ट्य...

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group