मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रसिद्ध मराठी अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर यांना हात जोडून माफी मागावी लागली आहे. सध्या त्या स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मराठी मालिकेत काम करीत आहेत. वर्षा यांना माफी का मागावी लागली, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, कोळी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.
वर्षा यांनी मराठीबरोबरच हिंदी चित्रपटात सुद्धा काम केलं आहे. 1993 साली प्रदर्शित झालेल्या इंसानियत के देवता या चित्रपटांमधून वर्षाने आपल्या हिंदी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. सध्या वर्षा उसगांवकर या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत नंदिनी शिर्के पाटील ही भूमिका साकारत आहे. मात्र सध्या त्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. वर्षा उसगांवकर यांनी कोळी समाजाबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी त्यांना हात जोडून माफी मागावी लागली आहे. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘यामिली’ या एका खासगी मासे विक्रेत्या अॅप बेस्ड कंपनीने एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीत ‘बाजार की मच्छी के साथ बदबू फ्री’ असा आशय लिहिण्यात आला होता. ही जाहिरात काही क्षणात व्हायरल झाली. या जाहिरातीवरुन मच्छिमार संतप्त झाले होते. या जाहिरातीत त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्यही केले होते. बाजारात बऱ्याच वेळा कोळणींकडून माझी फसवणूक झाली आहे. बाजारातल्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की, त्यावेळी मी हे पापलेट का घेतले, असे वाटून निराश झाले’ असे विधान वर्षा उसगांवकर यांनी केले. त्यांच्या या विधानाचा कोळी समाजाकडून तीव्र निषेध करण्यात आला.
https://twitter.com/StarPravah/status/1568501547016896514?s=20&t=PZokui1s5kONkZM8jXEAlg
जाहिरातीनंतर कोळी महिला विक्रेत्या चांगल्याच संतापल्या होत्या. “वर्षा उसगावकरांचे हे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे. दोन वेळेच्या जेवणासाठी जीवाचे राण करणाऱ्या मासे विक्रेत्या कोळी महिलांचा हा अपमान आहे. एका कष्टकरी महिलेचा अपमान मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज महिला कलाकारांकडून होणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. यातून गरिबांच्या प्रती असलेली मानसिकता प्रखरपणे दिसत आहे”, असे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती महिला अध्यक्षा नयना पाटील म्हटले होते. त्यासोबतच त्यांनी कोळी समाजाची माफी मागावी अन्यथा सडलेले मासे खाऊ घालू अशा शब्दांत त्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला होता. यानंतर ही जाहिरात फेसबुकवरून काढून टाकण्यात आली. वर्षा यांनी या ॲपचे प्रमोशन केले होते. या संपूर्ण प्रकरणानंतर वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.
https://twitter.com/StarPravah/status/1564938704971616257?s=20&t=PZokui1s5kONkZM8jXEAlg
वर्षा यांनी कोळी समाजाच्या बंधू-भगिनींची हात जोडून माफी मागितली आहे. याद्वारे त्यांनी या वादावर पडदा टाकला आहे. “नमस्कार मी वर्षा उसगांवकर, यामिली या अॅपबद्दल बोलताना जर माझ्याकडून कोळी समाजाच्या काही भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्यांची हात जोडून माफी मागते. त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. त्याउलट कोळी समाजाबद्दल मला नितांत आदर आहे. त्यामुळे कोळी समाजाच्या बंधू-भगिनींची मी पुन्हा एकदा हात जोडून माफी मागते. धन्यवाद”, असे त्यांनी या व्हिडीओत म्हटले आहे. वर्षा उसगावकर या मूळच्या गोव्याच्या असल्याने त्यांचा समुद्रकिनारा आणि कोळी बांधव यांच्याशी जवळचा संबंध आल्याचे सांगण्यात येते.
वर्षा उसगांवकर यांच्या पहिल्याच गंमत जंमत या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर बरेच रेकॉर्ड मोहित काढले आणि हा चित्रपट सुपर डुपर यशस्वी ठरला. त्यानंतर वर्षाने मागे वळून कधीच पाहिले नाही. तिला एका पेक्षा एक सरस चित्रपट मिळत गेले. हमाल दे धमाल, सगळीकडे बोंबाबोंब,सवत माझी लाडकी, एक होता विदूषक, लपंडाव,अफलातून हि तिच्या काही गाजलेल्या चित्रपटांची नावे आहेत. वर्षा यांनी आतापर्यंत 60 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. सुदैवाने तिला मिळालेले बरेच चित्रपट हे नायिकाप्रधान होते आणि त्यांनी तिच्या यशस्वी कारकिर्दीची घडी बसवली. दुनियादारी या चित्रपटांमध्ये वर्षा उसगावकर यांनी साकारलेले राणीमा यांची भूमिका ही विशेष दाद मिळवून गेली. वर्षाने मराठी चित्रपटात अनेक अभिनेत्यांसोबत जरी भूमिका केल्या असल्या तरी तिची जोडी फक्त अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांच्यासोबतच जमली होती.
https://twitter.com/StarPravah/status/1564817756968538112?s=20&t=PZokui1s5kONkZM8jXEAlg
Marathi Actress Varsha Usgaonkar Apologies for This Reason
Entertainment