India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

आई धुणीभांडी करते… पोरगा नुसता युट्यूब बघायचा…. नीटचा निकाल लागला…. सगळ्यांनीच तोंडात बोटं घातली…

India Darpan by India Darpan
September 11, 2022
in संमिश्र वार्ता
0

बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा अतिशय कठीण समजली जाते. विद्यार्थ्यांना नीट परीक्षेसाठी अतिशय कठोर अभ्यास करावा लागतो. नीट परीक्षेचा आता निकाल लागला आहे. या निकालातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याची ही यशोगाथा आहे. सध्या तिची राज्यभरात चर्चा होत आहे.

अतिशय खडतर आणि कठीण परिस्थितीवर मात करीत विनायक भोसले या विद्यार्थ्याचे हे यश आहे. आईचे कष्ट व आर्थिक परिस्थिती याची जाणीव ठेवून विनायकने डॉक्टर होण्याची जिद्द मनात बाळगली. त्याजोरावर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते हे त्याने सिद्ध केले आहे. नीटच्या शिकवणीची फी भरू शकत नसल्याने विनायक अर्जुन भोसले याने यू-ट्यूबवर अभ्यासक्रमाचे व्हिडिओ पाहून मेहनतीने अभ्यास केला व नीटच्या परीक्षेत ५९५ गुण प्राप्त केले आहेत.

घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने विनायक ट्युशन देखील लावू शकत नव्हता तसेच कोणत्याही क्लासला जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते त्यामुळे केवळ यू-ट्युबवरील अभ्यासक्रमांचे व्हिडिओ पाहून विनायक याने नीट परीक्षेत ५९५ गुण प्राप्त केले आहेत. त्याला आर्थिक स्थिती अडसर ठरली नाही, याचा आदर्श विनायक भोसले याने अन्य मुलांसमोर ठेवला आहे.

परळी तालुक्यातील सेलू येथील विनायकचे वडील अर्जुन भोसले यांचे सन २०१४ मध्ये अपघाती निधन झाले. पतीच्या निधनानंतर खचून न जाता विनायकची आई सुनीता यांनी लोकांच्या घरची धुणी-भांडी करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले. त्यांना दोन मुलगे व एक मुलगी आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सुनीता यांनी अंबाजोगाई गाठले. तिथे त्यांनी धुणी-भांडी करण्याचे काम सुरू केले. छोट्याशा भाड्याच्या खोलीत हे चार जणांचे कुटुंब राहते. याच ठिकाणी सर्वजण एकत्रित अभ्यास करतात.

विनायकचे दहावीचे शिक्षण माजलगाव येथे झाले. दहावीत असताना तो स्वतः म्हशीचा सांभाळ करून दूध वाटप करून आईला आर्थिक हातभार लावत असे. मात्र, अंबाजोगाईत चांगले शिक्षण असल्याने भोसले कुटुंब इथे स्थायिक झाले. आईचे कष्ट व आर्थिक परिस्थिती याची जाणीव ठेवून विनायकने डॉक्टर होण्याची जिद्द मनात बाळगली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत विनायकने जिद्दीने यश संपादन केले. त्याच्या पुढील शिक्षणासाठी अनेक शिक्षण संस्थाची पदाधिकारी यांनी मदतीच्या आश्वासन दिले आहे.

Success Story of Student NEET Exam YouTube Study
Beed District Vinayak Bhosale


Previous Post

अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी हात जोडून मागितली या समाज बांधवांची माफी; हे आहे कारण

Next Post

एकतर्फी प्रेमातून मुलीच्या भावाचा खून करणारा आरोपी तीन तासात गजाआड

Next Post
प्रातिनिधीक फोटो

एकतर्फी प्रेमातून मुलीच्या भावाचा खून करणारा आरोपी तीन तासात गजाआड

ताज्या बातम्या

महारेराच्या अंमलबजावणीवर उठताहेत प्रश्न…बिल्डरांवर काही कारवाई होतेय का…

October 2, 2023

ग्रामीण विकास योजनांच्या निधीवरुन पश्चिम बंगाल व केंद्र सरकारमध्ये जुंपली, केंद्र सरकारने दिले हे उत्तर

October 2, 2023

प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर इतके लाख लेखापरीक्षण अहवाल दाखल, प्राप्तिकर विभागाने मानले आभार

October 2, 2023

खंडणी मागायला आले अन् जाळ्यात अडकले

October 2, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्यावे, जाणून घ्या.. ३ ऑक्टोंबर २०२३चे राशिभविष्य

October 2, 2023

येवल्यात मुसळधार पाऊस; दुकान व घरात पाणी शिरले, दुचाकी रस्त्यावर आडव्या झाल्या (बघा व्हिडिओ)

October 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group