इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन क्षेत्रात अनेक जोड्या जमतात आणि तुटतातही. त्यातही काहीच जोड्या आहेत ज्या कायमस्वरूपी टिकतात. नवीन पिढीमध्ये अशा जोड्यांमध्ये आघाडीवर नाव आहे ते महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर-कोठारे यांचे. या दोघांची जोडी आणि त्यांची लेक जिजा सोशल मीडियावर भलतेच लोकप्रिय आहेत.
मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय कपलपैकी एक म्हणून ही जोडी ओळखली जाते. मात्र, ‘परफेक्ट फॅमिली’ आणि ‘परफेक्ट कपल’असलेल्या या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा काही काळापासून सुरू होती. नुकत्याच त्या वावड्या असल्याचे कळल्याने त्यांच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
‘प्लॅनेट मराठी’वरील एका कार्यक्रमाला उर्मिला कोठारे हिने नुकतीच हजेरी लावली. यावेळी तिने प्रेमाबद्दल आपले मत मोकळेपणाने मांडले. या कार्यक्रमात तिला तिच्या खासगी आयुष्याबरोबर चित्रपटाबद्दलचे अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावरही ती दिलखुलासपणे बोलली.
उर्मिलाला ‘प्रेम म्हणजे काय?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर ती म्हणाली, “प्रेम म्हणजे मैत्री आणि विश्वास.” पण याच प्रेमाने जखम दिली तर, असे उर्मिलाला विचारण्यात आले. त्यावर तिने तात्काळ मग दुसरं प्रेम शोधायचं, असं उत्तर दिलं. तिचे हे उत्तर ऐकून अभिनेत्री क्रांती रेडकरसह सर्वजण जोरजोरात हसायला लागले.
सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘कंपास’ या वेबसीरिजमध्ये उर्मिला कोठारे लवकरच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. यात उर्मिलासह सायली संजीव, ऋतुजा बागवे, पौर्णिमा डे, सुयश टिळक, संग्राम साळवी, सौरभ गोखले, आनंद इंगळे, संजय मोने अशी तगडी स्टारकास्ट आहे. लवकरच ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
https://twitter.com/UrmilaKothare/status/1628011019221204994?s=20
Marathi Actress Urmila Kothare Bold Statement Viral