India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

गुंतवणूकदारांनो, पंकज सोनूपासून सावधान! नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने दिला हा गंभीर इशारा; कोण आहे तो? असं काय केलं त्याने?

India Darpan by India Darpan
March 12, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळ्या योजनांच्या आधारे अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या पंकज सोनू ठगबाजापासून सावध राहण्याचा इशारा नॅशनल स्टॉक एक्स्चेंज अर्थात एनएसईने दिला आहे.

पंकज सोनू नामक व्यक्ती ‘ट्रेडिंग मास्टर’ या नावाची संस्था चालवतो. यो दोन्हींपासून गुंतवणूकदारांनी लांब राहावे, असे एनएसईने सांगितले आहे. पंकज सोनू हा भोळ्या गुंतवणूकदारांशी संपर्क साधतो आणि त्यांना स्टॉक मार्केटच्या गुंतवणुकीवर खात्रीशीर परतावा देण्याचे आमिष दाखवतो. तसेच गुंतवणूकदारांनी त्यांच्या ट्रेडिंग खात्याचे लॉगिन डिटेल्स शेअर करावे, जेणेकरून तो स्वतः गुंतवणूकदारांच्या वतीने व्यवहार करू शकेल, अशी बतावणीदेखील या सोनूकडून करण्यात येते.

२०२१ साली स्थापन झालेल्या ट्रेडिंग मास्टरने दावा केला होता की, त्यांच्या कंपनीने स्वयंचलित ट्रेडिंग सेवा देणारे तंत्रज्ञान विकसित केले असून ट्रेडिंग मास्टर त्याद्वारे वित्तीय सेवा देत आहे. नोएडा, उत्तर प्रदेश येथे स्थित असलेल्या या कंपनीच्या वेबसाईटने असाही दावा केला की, त्यांच्याकडे आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स प्रोग्रामिंग तंत्रज्ञान आहे आणि त्या माध्यमातून खात्रीशीर परतावा मिळतो. गेल्या वर्षी कंपनीने मास्टर बॉट लाँच केला होता. एआय सक्षम असलेले हे बॉट गुंतवणूकदारांना स्टॉक मार्केटमध्ये खरेदी आणि विक्रीचे संकेत देण्यात मदत करेल, असे सांगण्यात आले होते.

अशी होते फसवणूक
पंकज सोनू हा लोकांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये चांगला परतावा मिळतो, असे सांगून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करतो. त्याचबरोबर सोनू गुंतवणूकदारांना त्यांचे लॉगिन डिटेल्स आणि पासवर्ड शेअर करण्यास सांगून त्यांचे ट्रेडिंग खाते हाताळण्याची ऑफर देतो. अशा प्रकारे अनेक जण फसवणुकीला बळी पडले आहेत.

Alert NSE Investors Pankaj Sonu Fraud Trading


Previous Post

मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेचे बोल्ड वक्तव्य चर्चेत

Next Post

विश्वचषक भारत जिंकल्यास कपडे काढेन या वक्तव्याबाबत मॉडेल पूनम पांडे म्हणाली….

Next Post

विश्वचषक भारत जिंकल्यास कपडे काढेन या वक्तव्याबाबत मॉडेल पूनम पांडे म्हणाली....

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group