गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अमृता खानविलकर-सई ताम्हणकर यांचं पटत नाही? सईने दिले हे स्पष्ट उत्तर

by India Darpan
नोव्हेंबर 13, 2022 | 5:03 am
in मनोरंजन
0
Sai Amruta

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दोन बायकांचं कधीच पटत नाही, असं म्हटलं जात. आणि बायका देखील हे आपल्या वागण्यातून अनेकदा सिद्ध करताना दिसतात. सध्या बायकांची ही परिस्थिती तर सेलिब्रिटींबाबत विचारायलाच नको. दोन अभिनेत्रींनमध्ये मैत्री असतेच असं नाही, असं अनेकदा दिसून आलं आहे. अभिनेत्रींची भांडणं काही नवी नाहीत. अनेकदा अभिनेत्रींनी त्यांच्यातलं हे टशन उघडपणे दाखवूनही दिलं आहे.

दोन अभिनेत्री एकमेकींच्या मैत्रिणी असू शकत नाही, अशी चर्चा असते. बॉलिवूडमध्ये हे गॉसिपचे विषय ठरलेले असतात. बॉलिवूडमध्ये या कॅटफाइट्स काही नव्या नाहीत. करिना-बिपाशा, राणी- ऐश्वर्या यांची भांडणं सगळ्यांनाच माहित आहेत. पण आता याच गोष्टी मराठी सिनेसृष्टीतही असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये टशन असल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठीतील अशीच एक सेलिब्रिटी मैत्रिणींची जोडी आहे. सध्या मात्र त्यांच्यात वितुष्ट आल्याची चर्चा आहे. यातील त्या दोघी म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेत्री अमृता खानविलकर. मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. सई ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. हिंदीतही तिचे चाहते कमी नाहीत. शिवाय वेब सिरीजमध्येही ती झळकताना दिसते. मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारत सईने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, सई ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सई आणि अमृता यांच्यातील दुराव्याबाबत नुकतेच सई ताम्हणकरने स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

आर.जे. सिद्धार्थ कननला सई ताम्हणकरने नुकतीच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तिला अमृता खानविलकरबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ‘सई आणि अमृता यांच्यात काही आलबेल नाही, तुमच्या मैत्रीत दुरावा आला आहे का?, अमृताला ज्या भूमिकांसाठी विचारणा करण्यात आली त्याच भूमिका त्यानंतर तुझ्याकडे आल्या यामुळे ती नाराज झाली आहे का?’ असे प्रश्न यावेळी सईला विचारण्यात आले. यावर सई ताम्हणकरने याबद्दल आपल्याला काहीच ठाऊक नसल्याचे सांगितले.

ही प्रतिक्रिया दिल्यानंतर ती म्हणाली की, हे असं तर होणारच ना. अनेकदा एका भुमिकेसाठी दोघांना विचारली जाते. हा आपल्या कामाचाच एक भाग आहे. परंतु या कारणावरुन कोणी रुसेल किंवा मनात काही अढी ठेवेल असं मला वाटत नाही. आणि व्यावसायिकदृष्ट्या ते योग्यही नाही. शिवाय असं काही झालं असेल असे मला तरी वाटत नसल्याचे सई सांगते. एवढंच नाही तर, आता सोशल मीडियावर ज्या चर्चा आहेत, त्याबद्दल मी लगेचच अमृताला फोन करुन विचारणार असल्याचं सईने यावेळी सांगितले.
वाचकांच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की, सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर या दोघीही एकमेकांच्या खास मैत्रिणी आहेत. त्या अनेकदा एकत्र फिरतानाचे फोटो शेअर करत असतात. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्सेही समोर आले आहेत.

Marathi Actress Sai Tamhankar and Amruta Khanvilkar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – याचा आपण कधी विचार करतो का?

Next Post

संसद अधिवेशनामुळे भारत जोडो यात्रा खंडित होणार? राहुल गांधी काय करणार?

India Darpan

Next Post
Rahul Gandhi e1667637323998

संसद अधिवेशनामुळे भारत जोडो यात्रा खंडित होणार? राहुल गांधी काय करणार?

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011