India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

…म्हणून रखडलंय प्राजक्ता माळीचं लग्न (Video)

India Darpan by India Darpan
February 26, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तरुणांच्या दिलाची धडकन आणि प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहे. सुंदर चेहरा, निखळ हसू आणि उत्तम अभिनय या गुणांच्या जोरावर प्राजक्ताने मनोरंजन क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. नुकतंच तिने दागिन्यांमध्येही स्वतःचा ब्रँड निर्माण केला आहे. या क्षेत्रात आता स्थिरावलेल्या प्राजक्ताच्या लग्नाची चर्चा सुरू झाली नाही तरच नवल.
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय आहे. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या प्राजक्ता माळी ही एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहे. प्राजक्तानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे.

सध्या प्राजक्ताच्या लग्नाची सातत्याने चर्चा सुरू आहे. प्राजक्ताने नुकतीच ‘प्लॅनेट मराठी’वरील ‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात देखील तिला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी प्राजक्ताने स्पष्टपणे उत्तर दिले. ‘तू पुढच्या वर्षी लग्न करते आहेस’, अशी चर्चा सध्या रंगली आहे, असे सूत्रसंचालिकेने प्राजक्ताला सांगितले.

त्यावर प्राजक्ताने अरे “हे दरवर्षी म्हटलं जातं. २०१८ पासून माझ्या लग्नाची चर्चा सुरू आहे. पण अर्ध्याहून अधिक महाराष्ट्राची अशी इच्छा आहे की मी लग्न करु नये, असेही ती गंमतीत म्हणते. “काहींना वाटतंय मी लग्न करावं, काहींना वाटतंय मी करु नये. मी लग्न करू नये असं ज्यांना वाटतंय त्यांच्यामुळे माझं लग्न रखडतंय, असं प्राजक्ता सांगते. त्या मुलांना भेटल्याशिवाय माझं लग्न होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे, असे प्राजक्ता माळी म्हणाली.

यावेळी प्राजक्ताला तिच्या खासगी आयुष्यापासून सगळ्या गोष्टींवर प्रश्न विचारण्यात आले. प्राजक्ता तिच्या लग्नाच्या बातम्यांविषयी बोलली आहे. प्राजक्ता म्हणते, ‘काही प्रेक्षकांची इच्छा आहे की, मी लवकरात लवकर लग्न करावं, तर काही प्रेक्षकांची इच्छा आहे की मी लग्न करू नये. त्यामुळे माझ लग्न रखडलंय.’ हे ऐकताच प्राजक्ताची मैत्रीण अभिनेत्री ऋतुजा बागवे म्हणाली, ‘तुला कुठे महाराष्ट्रीयन मुलगा हवाय, तुला कोण हवंय ते सांग ना.’ त्यावर प्राजक्ता म्हणते, की मला दाक्षिणात्य कलाकार खूप आवडतात. ते माझे क्रश आहेत. पण कोणीही असलं ना, तरी शेवटी आपण त्याला मराठीच बनवायचं, असा ठाम निश्चय ती व्यक्त करते.

प्राजक्ताच्या या वक्तव्यानंतर तिला अमराठी मुलाशी लग्न करायचं असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण तिने या मुलाखतीत कुठेही असं स्पष्ट केलेले नाही. प्राजक्ता माळीने काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत मी लग्नासाठी तयार असल्याचे सांगितले होते.

अख्खा महाराष्ट्र जिचा क्रश आहे,
तिचा क्रश कोण?

Ft: @PrajaktaMali #RutujaBagwe

'#पटलंतरघ्या With @JayantiJourno'

पहा पूर्ण एपिसोड
फक्त #PlanetMarathiOTT वर!
(विनामूल्य)#NoFilter

Download App Now – https://t.co/CU9XGVtEs0@PlanetMOTT

#WatchNow #म #chatshow #newepisode pic.twitter.com/mZQLCzNgDF

— Planet Marathi OTT (@PlanetMOTT) February 24, 2023

Marathi Actress Prajakta Mali on Her Wedding


Previous Post

लोकसंख्या वाढविण्यासाठी जोडप्यांना थेट महिनाभराची सुटी!

Next Post

किम जोंगची ट्रेन नव्हे शाही राजवाडाच! यातील सुविधा जाणून घ्याल तर थक्कच व्हाल!

Next Post

किम जोंगची ट्रेन नव्हे शाही राजवाडाच! यातील सुविधा जाणून घ्याल तर थक्कच व्हाल!

ताज्या बातम्या

धक्कादायक! सर्वात मोठे डेटा लीक उघड… १.२ कोटी WhatsApp, १७ लाख Facebook युजर्सचा डेटा चोरीला… ७ जणांना अटक

March 24, 2023

महाराष्टातील या ९ शहरांमध्ये राबविला जाणार स्वच्छ हवा कार्यक्रम

March 24, 2023

हे आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’… आजवर यांचा झाला सन्मान

March 24, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023

पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group