इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे रातोरात प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. अभिनयापेक्षाही म्युझिक आल्बम तसेच सोशल मीडियावरील वावरामुळे मानसी नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावरही मानसी चांगलीच सक्रिय असते. तिचा नवरा प्रदीप खरेरा यांच्यासोबतचे अनेक व्हिडीओज मानसी सातत्याने शेअर करत असते. आपलय आयुष्यातील अनेक घटनांची माहिती ते सोशल मीडियावर देत असतात.
मानसीने नुकतीच एक गुड न्यूज शेअर केली आहे. पती प्रदीप खरेरासोबत तिने ही न्यूज दिली आहे. थांबा, गुड न्यूज म्हटल्यावर तुमच्या डोक्यात जे काही आलं असेल, ते बाजूला ठेवा. ही गुड न्यूज म्हणजे मानसीने नुकतीच एक आलिशान गाडी खरेदी केली आहे.
मानसीच्या घरी एका नवीन पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर तिने एक व्हिडीओ शेअर करत आपल्या घरी आलेल्या नवीन पाहुण्याची माहिती तिने आपल्या चाहत्यांना दिली आहे.
मानसीने ऑडी ही नवीन गाडी खरेदी केली आहे. या गाडीचं घरी स्वागत करतानाचा व्हिडीओ तिच्या इन्स्टा पेजवर बघायला मिळतो. याची कॅप्शन देखील इंटरेस्टिंग आहे. look whose the new audi girl welcome home baby, असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. ही गुड न्यूज पाहून चाहत्यांसह सेलिब्रिटींनी मानसीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. मानसीचा नवरा प्रदीप खरेरा हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील बॉक्सिंग खेळाडू आहे. तो देखील सोशल मीडियावर सक्रिय असतो. मानसी आणि प्रदीप या दोघांच्या रिल्सचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत.
Marathi Actress Manasi Naik New Guest at Home
Entertainment Audi Car