इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा चांगलाच लोकप्रिय आणि प्रेक्षकांचा लाडका अभिनेता आहे. छोट्या पडद्यावरच्या त्याच्या मालिका आणि कथाबाह्य कार्यक्रम देखील प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरतात. याशिवाय त्याची नाटके देखील सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, आणि त्यालाही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, सध्या त्याचे चाहते काळजीत आहेत.
संकर्षणवर गुंडांचा हल्ला?
सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असलेल्या संकर्षणने नुकतीच एक पोस्ट शेअर करत आपल्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली आहे. त्याची ही पोस्ट पाहून त्याच्या चाहत्यांना त्याच्या तब्येतीची काळजी वाटू लागली आहे.
पोस्टमध्ये काय?
हातावर जखम झालेला फोटो संकर्षणने शेअर केला. या फोटोत त्याने हातावर पट्टी बांधलेली दिसते. फोटो शेअर करत त्याने लिहिले की, ‘परवा रात्री माझ्यावर चार गुंडांनी हल्ला केला, मी त्यांच्याशी दोन हात केले, त्यात माझा एक हात जखमी झालाय, याची तुम्हाला शून्य कल्पना होती म्हणून हा फोटो पोस्ट करतोय.’ या पोस्टमध्ये त्याचा जखमी हात तर दिसतो आहे, पण त्याने दिलेल्या कॅप्शनमुळे खरंच त्याच्यावर गुंडांनी हल्ला केला होता की इतर गोष्टीमुळे त्याचा हात दुखावला हे कळू शकलेले नाही.
पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया
अभिनेत्री स्पृहा जोशीने त्याच्या या पोस्टवर ‘मस्त रे..’ अशी कमेंट केली आहे. तर त्याच्या पोस्टवर काही चाहत्यांनी काळजी घेण्यास सांगितले आहे.
Marathi Actor Sankarshan Karhade Injured