कोपरगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच जिल्ह्यातील तहसीलदार लाचखोर निघाला आहे. लाचखोरीला आळा बसावा, गैरव्यवहार थांबावे म्हणून राज्य सरकारने नवे वाळू धोरण आणले. तरीही वाळूच्या वाहतुकीवरुन लाचखोरी होत असल्याचे स्पष्ट होत आहे. तब्बल २० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कोपरगावचा तहसीलदार विजय जबाजी बोरुडे (वय ४४) आणि खासगी एजंट गुरमीत सिंग दडियल (वय ४० वर्ष) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे.
एसीबीने दिलेल्या माहिती नुसार, वाळू वाहतूकीचे गाडीवर कारवाई न करण्याकरिता गुरमीत याने तहसीलदार बोरुडे याच्यासाठी २० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली. एसीबीने सापळा रचला आणि या सापळ्यात गुरमीत हा सापडला. गुरमीत याला २० हजाराची लाच घेताना रंगेहात सापडला आहे. याप्रकरणी गुरमीत आणि बोरुडे यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
*सापळा अधिकारी*
संदीप साळुंखे, (पोलीस निरीक्षक) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक,
*सह सापळा अधिकारी*
वैशाली पाटील (पोलीस उप अधीक्षक) लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक
*सापळा पथक*-
पो. ह. पंकज पळशीकर ,
पो.ना. नितीन कराड,
पो.ना. प्रवीण महाजन
पो. ना प्रभाकर गवळी
चापोना/संतोष गांगुर्डे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
*मार्गदर्शक* –
**मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391
*मा. श्री.नारायण न्याहाळदे* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक. मो.न. 9823291148
**मा.श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक. मो.न. 9822627288.
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक-
02532578230,
02532575628
*टोल फ्री क्रमांक १०६४ .*
ACB Raid Tahsildar agent Trap Bribe Corruption