India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

दोन हजार रुपयांच्या नोटांची बंदी योग्य की अयोग्य? राज ठाकरे म्हणाले…

India Darpan by India Darpan
May 20, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय चलनातून २ हजार रुपयांची नोट रद्द करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतल्यामुळे  पुन्हा एकदा देशात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात. हा धरसोडपणा आहे. असं सरकार चालत का? असा सवाल करत राज ठाकरेंनी मोदी सरकारला सुनावले आहे. राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

२ हजार रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. ज्या नागरिकांकडे दोन हजाराच्या नोटा असतील त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत त्या बँकेत जमा करता येतील किंवा बदलून मिळतील, असे रिझर्व्ह बँकेने निर्देशित केले आहे. यावर राज ठाकरे म्हणाले की, “हा धरसोडपणा आहे. तज्ज्ञांना विचारुन हा निर्णय झाला असता तर ही वेळ आली नसती. कधीही गोष्ट आणायची, कधीही बंद करायची, त्यावेळी जेव्हा नोटा आणल्या होत्या, तेव्हा त्या एटीएममध्येही जात नव्हत्या. म्हणजे नोटा एटीएममध्ये जात आहेत की नाहीत हे देखील पाहिलं नव्हतं. हे असले निर्णय परवडणारे नसतात देशाला. आता लोकांनी परत बँकेमध्ये पैसे टाकायचे, परत तुम्ही नवीन नोटा आणणार, असं सरकार चालतं का? असे प्रयोग होतात का?” असा खोचक सवालच ठाकरे यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

आज नाशिक दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला, त्यातील महत्वाचे मुद्दे :

🔸 नोटबंदीतला धरसोडपणा परवडण्यासारखा नाही हे मी पहिल्याच नोटबंदीच्या वेळेस म्हणालो होतो. तज्ज्ञांना विचारून नोटबंदी झाली असती तर हि वेळ आली नसती.

🔸 २ हजार रु. च्या नोटा आणल्या तेव्हा त्या ATM मध्ये भरल्या पण… pic.twitter.com/aOrdJzCj7K

— Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2023

MNS Chief Raj Thackeray on 2 Thousand Notes Banned


Previous Post

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेवर गुंडांचा हल्ला? जखमी झाल्याची स्वतःच दिली माहिती

Next Post

नाशिक विमानसेवेच्या ब्रँडिंगसाठी या संस्थेने घेतला पुढाकार

Next Post

नाशिक विमानसेवेच्या ब्रँडिंगसाठी या संस्थेने घेतला पुढाकार

ताज्या बातम्या

ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २४०, तर जखमींची संख्या १ हजारावर

June 3, 2023

रेल्वेचा एवढा भीषण अपघात का आणि कसा झाला? तो टाळता आला असता का?

June 3, 2023

ड्रायव्हर आजारी पडल्याने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस (व्हिडिओ)

June 3, 2023

शरद पवार-गौतम अदानी भेटीने उंचावल्या सर्वांच्या भुवया; ही आहे बातमी मागची बातमी

June 3, 2023

झंझटच मिटली… कोरड्या हवामानात आणि अत्यल्प पाण्यात टिकणार ही वनस्पती.. शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

June 3, 2023
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमान तिकीटावर ४० टक्के, हॉटेल बुकींग्जवर ६० टक्के सूट; असा घेता येईल लाभ

June 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group