India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मनसेचे उत्तर महाराष्ट्रातील पहिले कामगार सेना कार्यालय सातपूरमध्ये; अमित ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

India Darpan by India Darpan
March 1, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या कार्यालयाचे उदघाट्न मनसे युवा नेते अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सातपुर एमआयडीसीमध्ये करण्यात आले. यावेळी मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण, चिटणीस मनोज रामराजे, मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड.रतनकुमार इचम, हाजी अजगर शेख, महिला आघाडीच्या सुजाता डेरे, जिल्हाप्रमुख अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे ५२ एमआयडीसी पैकी चालू स्थितीतील सुमारे २६ एमआयडीसीमध्ये किमान वेतन कायद्याचे पालन केले जात नाही. मालक वर्गाकडून हा कायदा पायदळी तुडवला जातो. या विरोधात आता मनसे रस्त्यावर उतरली आहे. त्यासाठी हे कार्यालय सुरु केले असून येत्या १२ तारखेला शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील खालापूर एमआयडीसीत दुसरे कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

दरम्यान, आयोजक तथा मनसे कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, प्रदेश चिटणीस योगेश शेवरे व सोपान शहाणे यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कामगारांच्या न्याय हक्कासाठी मनसे कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सलीम शेख यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रदेश चिटणीस योगेश शेवरे यांनी तर आभार सोपान शहाणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बंटी लबडे, नितीन माळी, वैभव महिरे, ज्ञानेश्वर बागडे, निशांत शेट्टी, विशाल भावले, विनोद यादव, चेतन खैरनार, मोहसीन शेख, जुनेद शेख, एजाज शेख, मीनानाथ नागरे, अमोल गवळी, राहुल सहाने, विनोद सिंग आदींसह मनसे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

कामगार सेनेची जबाबदारी शेख यांच्यासह शेवरे व शहाणेवर
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक सलीम शेख यांची तर प्रदेश चिटणीसपदी माजी नगरसेवक योगेश शेवरे व सोपान शहाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील कामगारांना न्याय देत पक्षाने टाकलेली जबाबदारी सार्थ ठरवणार असल्याची ग्वाही यावेळी शेख शेवरे व शहाणे यांनी अमित ठाकरे यांच्यासमोर दिली.


Previous Post

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी : भारतीय संघ गडगडला; पहिल्या दिवसाच्या अखेरीस अशी आहे स्थिती

Next Post

संजय राऊतांच्या अडचणी वाढणार! विधिमंडळात गदारोळ; अखेर अध्यक्षांनी दिले हे आदेश

Next Post

संजय राऊतांच्या अडचणी वाढणार! विधिमंडळात गदारोळ; अखेर अध्यक्षांनी दिले हे आदेश

ताज्या बातम्या

हे आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’… आजवर यांचा झाला सन्मान

March 24, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023

पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

March 24, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर

March 24, 2023
प्रातिनिधीक फोटो

इन्फ्लूएंझा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group