नाशिक – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसाच्या नाशिक दौ-यावर येणार आहे. १६, १७ व १८ जुलैला ते नाशिकला असणार आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी हा दौरा असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत मनसेने कंबर कसली असून त्यात यश मिळवण्यासाठी आता व्यूहरचना आखली जाणार आहे.
मनसेने २००७ मध्ये १२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २०१२ मध्ये ४० जागा जिंकून महानगरपालिकेची सत्ता मिळवली होती. पण, २०१७ मध्ये मनसेची घसरगुंडी झाल,. या निवडणुकीत केवळ मनसेला पाच जागा मिळाल्या. त्यामुळे या निवडणुकीत मनसेने पुन्हा गतवैभव मिळवण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा हा दौरा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.