मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक- आडगावला इनोव्हा कारमध्ये सहा लाख रुपयांचा साठ किलो गांजा जप्त

by India Darpan
जुलै 10, 2021 | 10:02 am
in क्राईम डायरी
0
crime diary 2

आडगावला इनोव्हा कारमध्ये साठ किलो गांजा 
नाशिक – आडगाव पोलिस ठाणे हद्दीतील नववा मैल रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमध्ये साठ किलो गांजा मिळून आला. पोलिसांनी जवळपास सहा लाख रुपयांच्या गांजासह सात लाख रुपयांची कार असा एकूण सुमारे तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी पहाटे आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी कर्मचारी दहावा मैल परिसरात गस्त घालत होते. नववा मैलजवळ पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार पार्किंग लाइट सुरू करून उभी होती. पोलिसांच्या निदर्शनास आले त्यानंतर गाडी जवळ जाऊन पाहिले. गाडीत दोन गोण्यांमध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू दिसली. ही माहिती रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांना कळविण्यात आली, त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गाडीचा दरवाजा उघडला असता मागील सीटवर दोन गोण्या आढळून आल्या. त्या गोण्या उघडून बघितल्या असता त्यात गांजा असल्याचे निष्पन्न झाले.

…..

दारु प्यायला पैसे न दिल्याने मारहाण
नाशिक – ठक्कर बाजार परिसरातील महाराष्ट्र ॲक्वेरियम दुकानासमोर शुक्रवारी दारुला पैसे दिले नाही म्हणून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी सागर शरद सोनवणे (वय २८, दामोधर निवास सोनवणे वाडा) याच्या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलिस ठाण्यात अमित दत्तात्रय व्यवहारे (वय २९, रामवाडी पंचवटी) आणि वैभव प्रकाश बागूल याच्यासह आणखी एक अशा तिघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. सागर सोनवणे हा शुक्रवारी (ता.९) दुपारी पावने तीनच्या सुमारास ठक्कर बाजारातील महाराष्ट्र ॲक्वेरियम या माशांच्या दुकाना गेला असता तेथे भेट झालेल्या दत्तात्रय व्यवहारे व वैभव बागूल याच्यासह तिघांनी त्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले पण सागरने पैसे न दिल्याने तिघांनी शिवीगाळ करीत लाथा बुक्यांनी आणि हातातील लोखंडी गजाने मारहाण केली. पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा तीन दिवसाचा नाशिक दौरा

Next Post

नाशिक – बटुक हनुमानाचे दागिणे चोरीला, महिलेवर संशय

Next Post
crime 6

नाशिक - बटुक हनुमानाचे दागिणे चोरीला, महिलेवर संशय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011