मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

युपीएससी परिक्षेसाठी संकेतस्थळावर नाशिक पर्याय उपलब्ध, परिक्षा केंद्राच्या निवडीसाठी अधिसूचना जाहीर

by India Darpan
जुलै 10, 2021 | 9:14 am
in स्थानिक बातम्या
0
upsc

 नाशिक : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यु.पी.एस.सी.) घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी आजवर महाराष्ट्रातील केवळ मोजक्याच शहरांचा समावेश होता. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. दरम्यान खासदार हेंमत गोडसे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षा मंडळाकडे पाठपुरावा केल्याने नुकतेच युपीएससी परिक्षेसाठी नाशिक परिक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ऑक्टोबर २०२१ महिन्यातील नियोजित परिक्षेसाठी अर्ज दाखल करतांना आयोगाने आज परिक्षेच्या ऑनलाईन संकेतस्थळावर नाशिक शहराचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.  यामुळे उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार असून त्यांना आता परिक्षार्थींना आयोगाच्या संकेतस्थळावर जावून नाशिक परिक्षा केंद्राची निवड करता येणार आहे.
       नाशिक विभागातून दरवर्षी हजारोंच्या संख्येने परिक्षार्थी युपीएससीच्या परिक्षेसाठी प्रविष्ठ होत असतांना मात्र परिक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी त्यांना २०० ते ३०० किलोमीटरचे अंतर पार करुन परिक्षा केंद्र गाठावे लागत होते. यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी मोठी गैरसोय होत होती. नाशिक येथे परिक्षा केंद्र उपलब्ध करुन द्यावे, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून परिक्षार्थीसह त्यांच्या शिष्ठमंडळांने खासदार गोडसे यांची भेट घेवून परिक्षा केंद्राविषयी आग्रही मागणी केली होती. परिक्षांर्थीची होणारी गैरसोयीची खा. गोडसे यांनी गंभीर दखल घेवून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दिल्ली येथील कार्यालयात वेळोवेळी नाशिक परिक्षा केंद्रासाठी सततचा पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेत नुकतेच गेल्या आठवड्यात आयोगाने देशात युपीएससी परिक्षेसाठी चार नवे परिक्षा केंद्र उपलब्ध करुन दिले असून यात महाराष्ट्रातील एकमेव नाशिक परिक्षा केंद्राचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील परिक्षांर्थीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी प्रत्यक्ष खा. गोडसे यांची भेट घेवून आभार मानले.
       दरम्यान आजपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाने नाशिक येथे परिक्षा केंद्र प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. परिक्षार्थी, परिक्षा केंद्र आणि आयोग यांच्यातील नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी युपीएससी परिक्षेसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांसाठी आयोगाने एक विशेष परिपत्रक काढले असून संकेतस्थळावर नाशिक परिक्षा केंद्राची निवड करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार परिक्षार्थीनी संकेतस्थळाला भेट देत परिक्षा अर्जात फेरबदल करुन नाशिक केंद्राची निवड करावी, असे आवाहन खा. गोडसे यांनी केले आहे.

….

असे निवडता येणार नाशिक परिक्षा केंद्र
        युपीएससी परिक्षा मंडळाने नाशिक परिक्षा केंद्राची निवड करण्यासाठी ऑनलाईन संकेतस्थळावर पहिल्या टप्प्यात १२ ते १९ जुलै सायंकाळी सहा वाजेपर्यन्त तर दुसऱ्या तसेच दुसऱ्या टप्प्यात २६ ते ३० जुलै दरम्यान ही सुविधा युपीएससीच्या https : //upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. या सुविधेचा लाभ घेवून ऑक्टोबर २०२१ मध्ये होणाऱ्या परिक्षेसाठी परिक्षार्थीना नाशिक केंद्राची निवड करता येणार आहे परिक्षार्थीनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खा. गोडसे यांनी केले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – सीएनजी भरण्यासाठी रात्री लागतात पंपावर रांगा, वाहनधारक त्रस्त

Next Post

असा आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा तीन दिवसाचा नाशिक दौरा

Next Post
raj thakare 1

असा आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा तीन दिवसाचा नाशिक दौरा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

राज्यात या आठवड्यात अठरा जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 17, 2025
Untitled 47

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का…चार माजी नगरसेवकांनी घेतला शिवसेना शिंदे गटात प्रवेश

जून 17, 2025
Sudhakar Badgujar

भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी सुधाकर बडगुजर हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना, पण, प्रदेशाध्यक्षांच्या विधानामुळे संभ्रम

जून 17, 2025
Untitled 46

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली बैठक…झाले हे निर्णय

जून 17, 2025
rohini khadse e1712517931481

समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक, लुटमार करण्याच्या घटना…रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत केले ट्विट

जून 17, 2025
WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011