मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गाई, म्हशीसारख्या जनावरांचे दुध जास्त वाढावे यासाठी अवैधरित्या औषध विक्री करणा-या एकाला अटक करण्यात आली आहे. शहरातील हिरापुरा भागात पोलिसांनी छापा टाकत मोहम्मद एकबाल या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पाच बॉक्स मधील १ हजार ऑक्सिटोसिन औषधी बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
या औषधाच्या बाटल्यांचा वापर जनावरांचे दुध वाढविण्यासाठी केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दुपारी पोलिसांनी छापा टाकला. तेथील सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. या औषधाचा वापर अन्य वैद्यकीय कामासाठी होत असतो. मात्र जनावरांचे दुध वाढावे यासाठी या औषधांचा वापर केला जात आहे. या औषधांचा अवैधरित्या साठा करुन ते मालेगाव मध्ये वितरीत होत आहे. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मालेगाव शहरात येणारे जनावरांचे दुध केमिकलयुक्त तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Malegaon Oxytocin Seized by Police