मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील पवारवाडी पोलिसांनी सव्वा दोन लाखाचा गुटखा जप्त केला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहरातील जाफरनगर भागात एका यंत्रमाग कारखान्यात विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या गुटखा, पान मसाला साठवून ठेवल्याची माहिती मिळली. त्यानंतर पोलिस पथकाने छापा टाकत दोन लाख २४ हजाराचा गुटखा, पानमासाला जप्त केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.