मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील हिंगलाजनगर भागात एका घरामध्ये वयोवृध्द महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत सापडला. तर पतीला मार लागून त्यांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज पहाटेच्या सुमारास उघडीस आली आहे. अल्कमा अलताब हुसेन व अलताब हुसेन मो. सईद अशी दोघांची नाव आहे. हे दोघे पती-पत्नी एकटेच घरात राहत होते. ही घटना समजताच परिसरातील नागरीकांनी त्यांच्या घराजवळ गर्दी केली. दरम्यान घडलेली घटना संशयास्पद असून पोलिस या घटनेची अधिक चौकशी करीत आहे.