अजय सोनवणे – मालेगाव
मालेगाव – अमित अॅन्ड ग्रुप डान्स स्टुडिओची छोटीशी चिमुकली जीया मोरे ही मालेगावातून पहिली लहान मुलगी इंडिया बिग शो मेरी डान्स मेरी वीरासत शो मध्ये प्रथम विनर झाली. तिला दहा हजार विनर बक्षीस पण मिळाले आहे आणि &tv. वर त्या शोच्या प्रोमो मध्येही ती दिसत आहे. तसेच एक नवीन येणारा टी.व्ही. शो डान्स का दंगल या शोमध्येही जीया मोरे ही टॉप ५ नंबर ने वीनर झाली आहे. तसेच जीया मोरे हिला तीचे कोरीओग्राफर अमित भावसार व आकाश शेगर यांनी तिला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन दिल्याने आज मालेगावचे नाव नॅशनल कॉम्पिटिशन विंनर झाले आहे. जिया ही येथील रोहित भास्कर मोरे यांची ती कन्या आहे. त्यामुळे संपूर्ण मालेगावात जीया मोरे हिचे खुप कौतुक केले जात आहे.