मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नऊ हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत…५३० कोटी रुपये थकबाकी

by Gautam Sancheti
मार्च 21, 2025 | 5:28 pm
in स्थानिक बातम्या
0
mahavitarn

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महावितरणच्या नाशिक परिमंडलातील घरगुती, औदयोगिक, वाणिज्यिक, पाणीपुरवठा, पथदिवे व ईतर वर्गवारीच्या ३ लाख ७९ हजार ग्राहंकांकडे सद्यस्थितीत जवळपास ५३० कोटी ४६ लाख रुपये थकबाकी असुन, महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर असल्याने ही थकबाकी वसूली करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु आहे. या मोहिमेमध्ये वीज बिलांच्या थकबाकीमुळे नाशिक परिमंडलात माहे मार्च २५ महिन्यात ९ हजार २११ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून उर्वरित ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे काम सुरू आहे. सदर ग्राहकांना पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करून घ्यायचा असेल तर त्यांना नियमानुसार एकूण थकबाकीसह पुनर्रजोडणी शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांनी वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडलाच्या वतीने करण्यात आले आहे.

नाशिक मंडळाअंतर्गत घरगुती वर्गवारीतील एकूण १ लाख १२ हजार ग्राहकांकडे १० कोटी ८० लाख, वाणिज्यिक वर्गवारीतील १३ हजार १३७ ग्राहंकांकडे ३ कोटी २८ लाख रुपये, औद्योगिक वर्गवारीतील ६६३ ग्राहकांकडे ६१ लाख रुपये, पथदिवे वर्गवारीतील २ हजार ६७९ ग्राहकांकडे ७८ कोटी ६० लाख, पाणीपुरवठा योजनेतील १ हजार ४ ग्राहकांकडे २० कोटी १९ लाख तसेच मालेगाव मंडळाअंतर्गत घरगुती वर्गवारीतील एकूण ३८ हजार १०३ ग्राहकांकडे २ कोटी ८४ लाख, वाणिज्यिक वर्गवारीतील २ हजार ६९० ग्राहंकांकडे ५४ लाख रुपये, औद्योगिक वर्गवारीतील ३०१ ग्राहकांकडे ५९ लाख रुपये, पथदिवे वर्गवारीतील १ हजार ४५७ ग्राहकांकडे ५२ कोटी ४६ लाख, पाणीपुरवठा योजना ८६५ ग्राहकांकडे २३ कोटी ६८ लाख तर अहमदनगर मंडळात वरील सर्व वर्गवारीतील २ लाख १ हजार ९६१ ग्राहकांकडे ३३२ कोटी ६९ लाख रुपये थकबाकी आहे अशी एकूण नाशिक परीमंडलात एकूण ३ लाख ७९ हजार १३० ग्राहकांकडे ५३० कोटी ४६ लाख रुपये थकबाकी आहे.

दरमहा सातत्याने पाठपुरावा करून ग्राहकांना नित्यनेमाने संपर्क करून सुद्धा वीजबिलांची थकबाकी महावितरणसाठी चिंतेचा विषय आहे. ग्राहकांना वेळेत वीज बिल भरता यावे तसेच ग्राहकांच्या वीज वापराबाबत व बिलाबाबत पारदर्शकता यावी यासाठी ग्राहका़नी नोंदणी केलेल्या मोबाईलवर मीटर रिडी़ग, वीज बिलाचे व इतर आनुषंगिक संदेश दिले जातात, पण तरीही पूर्ण महिना विजेचा वापर केल्यानंतर मिळालेले देयक भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने महावितरणची पथके तयार करण्यात आली असून थकबाकीदार ग्राहकांविरोधात नाईलाजास्तव कठोर पाऊले घेत वसूली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. यासोबतच थकबाकीदार ग्राहकांनी वेळेत देयकांचा भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वा ईमेलवर वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस पाठविली जात आहे. या नोटीसचा विहित कालावधी संपताच ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केल्या जाणार आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर सदर ग्राहकाने वीज देयकाच्या थकबाकीची रक्कम व ग्राहक वर्गवारीनुसार पुनर्रजोडणी शुल्क (जीएसटीसह) भरल्यानंतर भौगोलिक भागानुसार ग्राहकांचा वीज पुरवठा पुर्ववत जोडणी करण्यास लागू शकतो. त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या वीज देयकाचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या वाहनांसाठी टाटा मोटर्सची अभिनेता विकी कौशलसोबत भागीदारी…या मोहिमेने होणार सुरुवात

Next Post

या महापालिका हद्दीतील ‘टीडीआर’ गैरव्यवहारप्रकरणी ७ कोटी वसुलीची दंडात्मक कारवाई

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
विधानभवन002 1024x512 1

या महापालिका हद्दीतील ‘टीडीआर’ गैरव्यवहारप्रकरणी ७ कोटी वसुलीची दंडात्मक कारवाई

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाचा योग, जाणून घ्या, मंगळवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 4, 2025
WhatsApp Image 2025 08 04 at 1.51.07 PM 1920x865 1 e1754317916454

मुख्यमंत्र्यांकडून वॉररुमध्ये ३० प्रकल्पांचा आढावा…दिले हे निर्देश

ऑगस्ट 4, 2025
anjali damaniya

धनंजय मुंडेंचे मंत्रीपद गेल्यानंतरही शासकीय बंगला ५ महिने खाली केला नाही…अंजली दमानिया यांनी केली ही टीका

ऑगस्ट 4, 2025
Untitled 4

भारतीय संघाने इंग्लंड विरुध्दच्या अंतिम कसोटी सामन्यात ६ धावांनी मिळवला थरारक विजय

ऑगस्ट 4, 2025
accident 11

धावत्या रिक्षातून पडल्याने ५८ वर्षीय प्रवासी गंभीर जखमी…चालकाच्या हलगर्जीपणामुळे घटना, गुन्हा दाखल

ऑगस्ट 4, 2025
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जनतेच्या आरोग्यासाठी समर्पित योजना 1

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नाशिक विभागातील ३,५४२ रुग्णांना ३२ कोटी ३२ लाखांची मदत

ऑगस्ट 4, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011