मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कल्याण – डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील मौजे गावदेवी येथील जमिनीबाबत जमीन विकास हक्क हस्तांतरणात (टीडीआर) गैरव्यवहार झाल्याची चौकशी ठाणे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली आहे. या जमिनीच्या ‘टीडीआर’ गैरव्यवहारप्रकरणी ७ कोटी वसुलीची दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील जमीन विकास हक्क हस्तांतरण बाबत सदस्य किसन कथोरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
या प्रश्नाच्या उत्तरात मंत्री श्री.सामंत म्हणाले, या गैरव्यवहारप्रकरणी दोन तलाठ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच गुन्हाही दाखल करण्यात आला असून विष्णू नगर पोलिसांमार्फत पुढील तपास सुरू आहे.