India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला हा मोठा निर्णय; ठाकरे गटाची ही मागणी फेटाळली

India Darpan by India Darpan
February 17, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय घेतला आहे. ही सुनावणी ७ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्यात यावी, अशी आग्रही मागणी ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली होती. यासंदर्भात आज सरन्यायाधीशांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार हे प्रकरण पाच सदस्यीय खंडपीठाकडेच राहणार आहे. तसेच, याप्रकरणी येत्या २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी करण्याचे न्यायालयाने जाहीर केले आहे.

सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या या सुनावणीमध्ये ठाकरे आणि शिंदे गटाने त्यांचा युक्तीवाद पूर्ण केला आहे. दोन्ही गटाच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला. दोन्ही गटांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज, शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली. याच सुनावणीत न्यायालय स्पष्ट केले की,  नबाम रेबिया प्रकरणाचा फेरविचार करण्याची गरज नाही. तसेच, हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्यात येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

साडेसात महिने आणि २० तारखा
हे प्रकरण सात न्यायामूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून न्यायालयात दोन्ही गटांकडून युक्तीवाद सुरू होता. शिंदे गटाने जोरदार युक्तीवाद केला. त्यानंतर ठाकरे गटाने त्यांची बाजू आक्रमकपणे मांडली. अखेर युक्तीवाद पूर्ण झाला आहे. मात्र, न्यायालयाने आता निकाल राखून ठेवला आहे. हे प्रकरण न्यायालयात जाऊन साडेसात महिने झाले आहेत. तसेच, न्यायालयात आजापर्यंत एकूण २० तारखा झाल्या आहेत. आता २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी नियमित सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच, याप्रकरणी आता अंतिम निकाल लवकरच लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

#BREAKING Supreme Court Constitution bench holds that the issue whether Nabam Rebia judgement requires a reference to a larger 7 judge bench will be decided along with the merits of the case concerning #ShivSenaRift. The merits of the case will be heard on 21st Feb#SupremeCourt pic.twitter.com/DzJ0k4FWPR

— Live Law (@LiveLawIndia) February 17, 2023

Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing Today


Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

पारोळा व एरंडोल तालुक्यातील सात हजार हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली; हा प्रकल्प ठरणार संजीवनी

Next Post

पारोळा व एरंडोल तालुक्यातील सात हजार हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली; हा प्रकल्प ठरणार संजीवनी

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023

पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

March 24, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर

March 24, 2023
प्रातिनिधीक फोटो

इन्फ्लूएंझा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर

March 24, 2023

गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी; तब्बल ७० लाखांना गंडा

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group