बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील ३ नर्सेसला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान; राष्ट्रपतींनी केले सन्मानित

by India Darpan
जून 22, 2023 | 7:11 pm
in राष्ट्रीय
0
pushpa Shrawan Podey.jpg 2 e1687441159502

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थवृत्तीने सेवा देणाऱ्या आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ सर्व स्तरावर पोहोचविणाऱ्या सर्वोत्कृष्ट परिचारिका आणि परिचारक यांचा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करून गौरवण्यिात आला. याप्रसंगी 2022 आणि 2023 च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात 2022 मध्ये महाराष्ट्रातील 1 आणि वर्ष 2023 मध्ये 2 परिचारिकांचा समावेश आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने आज राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री एस.पी.सिंग बघेल विभागाचे सचिव राजेश भुषण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी वर्ग, आरोग्य क्षेत्रात काम करणारे व्यक्ती उपस्थित होते.

यावेळी वर्ष 2022 मध्ये 15 आणि वर्ष 2023 मध्ये 15 असे एकूण 30 परिचारिका आणि परिचारक यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. वर्ष 2022 मध्ये मिळालेल्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून पालघर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, निर्मल उपकेंद्र, भुईगांव येथील सहायक परिचारिका (दाई) सुजाता पीटर तुस्कानो, वर्ष 2023 मध्ये मिळालेल्या पुरस्कारांमध्ये राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा रूग्णालयाच्या सार्वजनिक आरोग्य परिचारिका पुष्पा श्रावण पोडे आणि दक्षिण कमांड (वैद्यकीय ) मुख्यालय पुण्याच्या ब्रिगेडियर एम.एन.एस.अमिता देवरानी यांचा समावेश आहे.

सुजाता पीटर तुस्कानो यांचा सहायक परिचारिका (एएनएम) म्हणून 35 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी निमवैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत अनेकांना आरोग्य सेवा प्रदान केलेली आहे. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील आरोग्याशी विषयक कार्यशाळेत त्या नेहमीच सहभागी होत असत. व्यापक समाजकार्यासाठी यापूर्वी श्रीमती तुस्कानो यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानपत्रे देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.

पुष्पा श्रावण पोडे चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हा रूग्णालयात सार्वजनिक आरोग्य परिचारिका म्हणून मागील 21 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्या त्यांच्या कामाप्रती अंत्यत वचनबद्ध व मेहनती परिचारिका म्हणून लोकप्रिय आहेत. श्रीमती पोडे यांनी लक्ष्यपूर्तीसाठी सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदविला आहे. श्रीमती पोडे यांनी दिलेल्या आरोग्य सेवेतील लक्षणीय योगदानाबद्दल त्यांना स्थानिक पातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.

ब्रिगेडियर अमिता देवरानी, सध्या पुणे येथे दक्षिण कमांड (वैद्यकीय)च्या मुख्यालयात ब्रिगेडियर एम. एन. एस. म्हणून कार्यरत आहेत. ब्रिगेडियर देवरानी यांनी 37 वर्ष लष्करात परिचारिका म्हणून सेवा बजावली आहे. त्या उत्तम शिक्षक आणि प्रशासक आहेत. लष्कराच्या दक्षिण कमांड अंतर्गत येणाऱ्या भूदल, नौदल आणि हवाई दलाच्या 50 रूग्णालयांचे कामकाज त्या पहातात. कोविड-19 संकटकाळात त्यांनी केलेले काम प्रशंसनीय आहे. आरोग्य क्षेत्राशी संबधित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. काँगो रिपब्लिक या देशात संयुक्त राष्ट्राने राबविलेल्या मोहिमेत संकटग्रस्त परिस्थितीत मृतदेहांचा शोध आणि व्यवस्थापन यासाठी बजावलेल्या कामगिरीबद्दल संयुक्त राष्ट्राने त्यांचे विशेष कौतुक केलेले आहे. ब्रिगेडियर देवरानी यांना लष्करी शुश्रुषेसाठी अनेक पुरस्कार आणि प्रशस्तीपत्रे मिळालेली आहेत.

वर्ष 1973 पासून राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारांची सुरूवात करण्यात आलेली आहे. आतापर्यंत एकूण 614 परिचारिका आणि परिचारक यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. पदक आणि प्रशस्ती पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांबाबत शिक्षण विभागाने काढले हे आदेश

Next Post

एसटी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रकचा अपघात… १ ठार, १५ प्रवासी जखमी… नाशिक शहराजवळील घटना…

India Darpan

Next Post
IMG 20230622 WA0021

एसटी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रकचा अपघात... १ ठार, १५ प्रवासी जखमी... नाशिक शहराजवळील घटना...

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011