शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आता सप्टेंबरमध्ये तरी पाऊस बरसणार का… असा आहे महाराष्ट्रासाठी हवामानाचा अंदाज…

by India Darpan
ऑगस्ट 31, 2023 | 6:22 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
monsoon clouds rain e1654856310975

आता सप्टेंबरमध्ये तरी पाऊस बरसणार का…
असा आहे हवामानाचा अंदाज…
‘आता मुंबईसह कोकणातही पावसाचा जोर होणार कमी’

संपूर्ण महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचे सावट आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात पाऊस न झाल्याने शेतपिके संकटात आहेत. शिवाय पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष सप्टेंबर महिन्याकडे लागले आहे. सप्टेंबर महिन्याचा हवामान अंदाज नेमका का आहे हे आपण आता जाणून घेऊया…

Manikrao Khule
माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५

मागे गुरुवार दि.२४ ऑगस्टला महाराष्ट्रासाठी गुरुवार दि. ७ सप्टेंबर पर्यन्त दिलेला ढगाळ वातावरणसहीत किरकोळ पावसाचा अंदाज कायम असुन तो कालावधी रविवार दि १० सप्टेंबरपर्यन्तही वाढू शकतो, असे वाटते.
आज गुरुवार दि. ३१ ऑगस्ट पासून मुंबईसह कोकण व सह्याद्री घाटमाथ्यावरचा पूर्वीचा असलेला जोरदार पावसाचा अंदाजही आता ओसरत असुन तेथे २ दिवसानंतर म्हणजे रविवार दि.३ सप्टेंबर पासून पुढील आठवडाभर म्हणजे रविवार दि.१० सप्टेंबरपर्यन्त आता केवळ मध्यम ते मुसळधार पावसाचीच  शक्यता जाणवत आहे.

‘मान्सूनी आस’ व  ‘प्रणाल्यां’चे पुढील रब्बी हंगामात पावसासाठी जर अनुकूल स्थलांतर झाले तरच पोळा सणाच्या आत म्हणजे सप्टेंबर ११ ते १४ दरम्यान पहिल्या व अनंत चतुर्दशीच्या आत म्हणजे २५ ते २९ सप्टेंबर दरम्यानच्या दुसऱ्या आणि घटस्थापनेच्या आत म्हणजे ऑक्टोबर ९ ते १३ दरम्यानच्या तिसऱ्या अश्या एकूण ३ पावसांच्या आवर्तनापैकी  एखाद्य-दुसऱ्या आवर्तनातून महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता असू शकते, एव्हढेच आशादायी चित्र जाणवते आहे, असे वाटते.

कारण बंगालच्या उपसागरात आज ४ विविध ठिकाणी व विविध उंचीच्या पातळीवर चक्रीय वाऱ्यांची स्थिती जाणवत आहे. शिवाय ५ दिवसानंतर म्हणजे ४ सप्टेंबर दरम्यान अजुन एक चक्रीय वारा प्रणाली स्थिती तेथे तयार होण्याची शक्यता जाणवत आहे. ह्या सर्व घडामोडी देशात सप्टेंबर च्या पावसासाठी अनुकूल ठरु शकतात असे वाटते. महाराष्ट्रासाठी ह्या वातावरणाचा काय फायदा होवु शकतो, हे त्या त्या वेळी सांगितले जाईल.

दुसरे असे कि, सध्या पंजाब हरियाणा राजस्थान सौराष्ट्र व कच्छ सहीत संपूर्ण वायव्य भारतात लागोपाठ अनेक दिवस पावसाची गैरहजरी व आर्द्रतेच्या टक्केवारीतील होणारी हळूहळू घसरण, व निरभ्र आकाश ह्यासारखे वातावरणीय बदल नकळत परतीच्या पावसाचेच वेध दर्शवू लागले आहेत, असे वाटते. अर्थात सध्या ह्या निरीक्षणावर विभाग मात्र सध्या नक्कीच लक्ष ठेवून आहे.
परंतु विरोधाभासात, सध्या पावसासाठी प्रतिकूलतेत ‘ एल-निनो ‘ ‘चे तर अनुकूलतेत नकळत तटस्थ ‘आयओडी ‘ चे सावट हे आहेच .

‘आयओडी’ सध्या विशेष नाही पण येणाऱ्या काळात धन अवस्थेकडे झुकू लागेल. म्हणजे प्रतिकूलतेत ‘ एल-निनो ‘ चा बळकट शह तर अनुकूलतेत कमकुवत धन ‘ आयओडी’ चा  काटशह जाणवतो. म्हणून तर रब्बी हंगामात स्थिती पाहून व हवामान व कृषी विभाग ह्यांच्या सूचनानुसारच जपून पावले टाकावीत, असा वारंवार सांगावेसे वाटते.

सध्या महाराष्ट्रात विदर्भ वगळता  दुपारच्या कमाल तापमानातही सरासरी पेक्षा २ डिग्रीने झालेली वाढ पुढील आठवडाभर म्हणजे कदाचित रविवार दि.१० सप्टेंबरपर्यंतही टिकून राहू शकते, असे वाटते. त्यामुळे उष्णतेत झालेली सध्याची अतिवाढ व वाऱ्याची शांतता शेतकऱ्यांचा शेवटच्या पायरीतील खरीप पिके जगवण्याच्या धडपडीचा मात्र कस लागत आहे.

सर्व वस्तुस्थिती आज आपणासमोर ठेवली आहे.
इतकेच !
माणिकराव खुळे,
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्,
भारतीय हवामान खाते,
पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५

Maharashtra Monsoon Rainfall September Forecast Weather
Climate Drought IMD

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गौणखनिजप्रश्नी नाशिक तहसिलदार आक्रमक… जप्त जमिनीचा थेट लिलाव…

Next Post

अदानींसंदर्भात राहुल गांधींनी थेट मोदींना विचारले हे गंभीर प्रश्न… (व्हिडिओ)

Next Post
Rahul Gandhi

अदानींसंदर्भात राहुल गांधींनी थेट मोदींना विचारले हे गंभीर प्रश्न... (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

Hon CM @ Metro 3 phase opening 2 1024x953 1 e1746811674674

मुंबई मेट्रो लाईन-३ सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

मे 9, 2025
IMG 20250509 WA0079 1024x683 1

पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाईल…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मे 9, 2025
Untitled 21

आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा, त्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा अभिमान…लोकसभा अध्यक्ष

मे 9, 2025
crime 13

घरात पाय घसरून पडल्याने ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अर्थकारण सुधारणार, जाणून घ्या, शनिवार, १० मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
IMG 20250509 WA0290 1

नाशिक येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011