India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक व स्टारचे मोठे विजय; गवळी १०३, ऋग्वेद जाधव ९६, आर्यन घोडकेचे १० तर मंथन पिंगळेचे ७ बळी

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा (१४ वर्षांखालील)

India Darpan by India Darpan
December 20, 2022
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात , हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर नाशिकने बीडवर १ डाव व ८७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. तर महात्मानगर क्रिकेट मैदानावर स्टार , पुणेनेही नंदुरबार विरुद्ध १ डाव व २२१ धावांनी मोठा विजय मिळवला.आपल्या गटातील तिन्ही सामने जिंकत नाशिक संघ गट विजेता ठरला.

गोल्फ क्लबवर पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी घेतलेल्या बीडने पहिल्या डावात १२६ धावा केल्या. नाशिकच्या व्यंकटेश बेहरेने ४ व मंथन पिंगळेने २ बळी घेतले. उत्तरदाखल नाशिकने ज्ञानदीप गवळी १०३ व ऋग्वेद जाधव ९६ व व्यंकटेश बेहरे नाबाद ५० यांच्या जोरावर ९ बाद ३८१ धावांचा डोंगर उभारला. दुसऱ्या डावात नाशिकच्या गोलंदाजांनी बीडला १६८ धावांत सर्वबाद करत मोठा विजय मिळवला. मंथन पिंगळेने ५ तर हुजेफा मर्चंटने २ गडी बाद केले.

तर महात्मानगर क्रिकेट मैदानावरील दुसर्‍या सामन्यात प्रथम फलंदाजी घेतलेल्या स्टार , पुणे ने पहिल्या डावात २७९ धावा केल्या. आर्यन लोंढे ने ७३ व झिदान मंगाने ६१ धावा केल्या. स्टार , पुणे च्या आर्यन घोडकेने पुन्हा एकदा भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन करत ७ बळी घेतले व नंदुरबारला केवळ १९ धावांत गुंडाळले. फॉलोऑन नंतरही दुसऱ्या डावात नंदुरबारला १९ धावांत सर्वबाद करत दणदणीत विजय मिळवला. स्टारच्या सर्वेश होन राव ने ६ तर आर्यन घोडकेने ३ गडी बाद केले.

महाराष्ट्रात विविध ठिकाणी ए ते आय अशा ९ गटात एकूण ३६ संघांमध्ये सदर साखळी स्पर्धा झाली . नाशिक संघ जी गटात अव्वल ठरला. सर्व सामने जिंकणाऱ्या नाशिक संघाचे, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी शाबासकी देत खास अभिनंदन केले आहे.

Maharashtra Cricket Test Match Nashik Win


Previous Post

‘ग्रामपंचायत निवडणुकीतही आम्हीच नंबर वन’, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा

Next Post

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; दिले हे पुस्तक, पण का?

Next Post

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; दिले हे पुस्तक, पण का?

ताज्या बातम्या

येत्या १ एप्रिलपासून बदलणार हे सर्व नियम… आजच घ्या जाणून… अन्यथा…

March 24, 2023

करौली बाबाच्या अनेक बाबी उघड… दररोज करोडोंची उलाढाल.. आश्रमात आहेत या शाही सुविधा… अॅम्ब्युलन्सचा यासाठी होतो वापर…

March 24, 2023

पुणेरी जाऊ द्या… आता या सोलापुरी बॅनरची जोरदार चर्चा… असं काय आहे त्यात? तुम्हीच बघा

March 24, 2023

बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी… येथे निघाल्या तब्बल ५३६९ जागा… येथे आणि असा करा अर्ज

March 24, 2023

रेशीम शेती एकरात… मिळेल पैसा लाखात….

March 24, 2023

वॉशिंग मशीन…. गुजरात निरमा…. बॅनरने वेधले विधिमंडळात सर्वांचे लक्ष

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group