माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
गेल्या १५ ते २० दिवसांपासून राज्यातील हवामानात लक्षणीय बदल झाला आहे. अवकाळी पाऊस, वीजांचा कडकडाट, गारपीट अशा प्रतिकूल हवामानाला आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. या हवामानाचा मोठा फटका प्रामुख्याने शेती क्षेत्राला बसला आहे. एकीकडे कांद्यासह शेतपिकांना चांगला भाव मिळत नसताना प्रतिकुल हवामानामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. परिणामी, आगामी आठवड्यात हवामानाचा अंदाज नेमका कसा असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्याविषयी आपण आता जाणून घेऊ…
उद्या सोमवार दि.२० मार्चपासुन विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गारपीट व गडगडाटी पावसाळीचे वातावरण पूर्णपणे निवळण्याची शक्यता जाणवते. विदर्भात मात्र आज तुरळक ठिकाणी गारपीट तर मंगळवार दि.२१ मार्चपर्यन्त केवळ ढगाळ वातावरण जाणवेल.
उद्या सोमवार दि. २० मार्चपासुन येत्या ३ दिवसात महाराष्ट्रात दिवसाच्या कमाल तापमानात हळूहळू जवळपास ४ डिग्रीने पुन्हा वाढ होण्याची शक्यता जाणवते, व त्यानंतर हे तापमान स्थिर राहण्याची शक्यता कायम आहे. म्हणजेच, अवकाळी पाऊस आणि गारपीटीनंतर आता आपल्याला कडाक्याच्या उन्हाळ्याला सामोरे जायचे आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1637320645934567426?s=20
Maharashtra Climate Weather Forecast This Week