India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय… भारतीय फलंदाजांनी टाकली नांगी… मालिकेत १-१ अशी बरोबरी

India Darpan by India Darpan
March 19, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ऑस्ट्रेलियाने तीन एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा 10 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 26 षटकांत 117 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने 11 षटकांत 121 धावा करत सामना जिंकला. विशाखापट्टणममधील या विजयासह कांगारू संघाने मालिकेत पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलियन संघ पहिली वनडे मुंबईत हरले होते. आता मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. तिसरा आणि शेवटचा सामना 22 मार्च रोजी चेन्नईत होणार आहे. हा सामना एक प्रकारे फायनल असेल. कारण, तिसरा एकदिवसीय सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 26 षटकांत 117 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने 11 षटकांत 121 धावा करत सामना जिंकला. मिचेल मार्शने 36 चेंडूत 66 आणि ट्रॅव्हिस हेडने 30 चेंडूत 51 धावा केल्या. मार्शने आपल्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. हेडने 10 चौकार मारले.

WHAT. A. PERFORMANCE 👊

Australia level the ODI series after a comfortable victory in Visakhapatnam! #INDvAUS | 📝 Scorecard: https://t.co/5ISBBNMhiZ pic.twitter.com/WXwrt4FXzl

— ICC (@ICC) March 19, 2023

भारताचा अर्धा संघ पॉवरप्लेमध्ये (प्रारंभिक 10 षटके) पॅव्हेलियनमध्ये परतला. ना रोहित शर्मा चालला ना हार्दिक पांड्या. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना खातेही उघडता आले नाही. परिस्थिती अशी होती की 11 पैकी फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. विराट कोहलीने सर्वाधिक 31 धावा केल्या. त्याचवेळी अक्षर पटेलने नाबाद 29 धावा करत संघाला 100 धावांच्या पुढे नेले. रवींद्र जडेजाने 16 आणि रोहित शर्माने 13 धावा केल्या. केएल राहुल नऊ आणि हार्दिक पांड्या केवळ एक धाव करू शकले. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने पाच आणि शॉन अॅबॉटने तीन बळी घेतले. नॅथन एलिसला दोन यश मिळाले.

Australia win the second #INDvAUS ODI. #TeamIndia will look to bounce back in the series decider 👍 👍

Scorecard ▶️ https://t.co/dzoJxTO9tc @mastercardindia pic.twitter.com/XnYYXtefNr

— BCCI (@BCCI) March 19, 2023

INDvsAus 2nd ODI Australia Win by 10 wickets


Previous Post

पाथर्डी फाटा भागात तीन जणांच्या टोळक्याने युवकावर केला प्राणघातक हल्ला

Next Post

या आठवड्यात हवामान कसे असेल? अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार का? असा आहे अंदाज…

Next Post

या आठवड्यात हवामान कसे असेल? अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार का? असा आहे अंदाज...

ताज्या बातम्या

बागेश्वर बाबा म्हणतात, मुंबईचे नाव आता हे हवे; नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे

March 22, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

नोटा मोजता मोजता प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना फुटला घाम; अखेर मागवले मशिन

March 22, 2023

खुशखबर! आता खासगी बसमध्येही महिलांना अर्धे तिकीट; ट्रॅव्हल्स कंपन्यांचा निर्णय

March 22, 2023

गांजाचा अवैध व्यापार करणाऱ्यांना न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

March 22, 2023
प्रातिनिधीक फोटो

दहावीनंतरच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा नक्की किती? केंद्र सरकारने केला खुलासा

March 22, 2023

शेतकऱ्याने उभारली कांदा, द्राक्षाची अनोखी गुढी; मागण्यांचे फलक लावून वेधले सरकारचे लक्ष

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group