शनिवार, नोव्हेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली; अमित शहांचा ग्रीन सिग्नल?

सप्टेंबर 24, 2022 | 12:30 pm
in मुख्य बातमी
0
eknath shinde amit shah e1664002114304

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा  चर्चेला उधाण आले आहे. या बैठकीत आता राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. शिंदे मात्र याला शिष्टाचार म्हणत आहेत. शहांनी मंत्रिमंडळ विस्ताराला ग्रीन सिग्नल दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

शहांना दसऱ्याचे निमंत्रण
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल आठव्यांदा दिल्लीवारी केली. दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरुन शिंदे राज्यात परतले आहेत. दिल्लीत शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची रात्री उशीरा भेट घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. येत्या ५ ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शहा यांना शिंदेंनी निमंत्रण दिल्याचे बोलले जात आहे. शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या शिंदे गटाला एमएमआरडीएच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये रॅलीला परवानगी मिळाली आहे.

शिंदे म्हणाले
सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या गटांमध्ये सुरू असलेल्या वादावरही शिंदे आणि शहा भेटीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. शिंदे यांनी ट्विटद्वारे म्हटले की, ‘दिल्ली भेटीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी शिष्टाचार भेट झाली. या भेटीदरम्यान राज्यातील विकासासह अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कुणाला संधी
सत्तास्थापनेवेळी केवळ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर जवळपास दीड महिन्यांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यात शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ जणांना संधी मिळाली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावरुन अद्यापही शिंदे गटात मोठे नाराजी नाट्य असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता या मंत्रिमंडळ विस्तारात नक्की कुणाला संधी मिळणार याची अनेकांना उत्सुकता आहे.

शुक्लांची भेट
एकनाथ शिंदे यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचीही भेट घेतली आहे. सध्या त्या हैदराबादमध्ये सीआरपीएफच्या एडीजी म्हणून कार्यरत आहेत. आता या भेटीनंतर त्यांच्या मुंबईत परतण्याबाबत चर्चा वाढल्या आहेत. विशेष बाब म्हणजे मुंबईत फोन टॅपिंग आणि कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी शुक्लांवर अनेक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात धाव
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून अनेक दिवसांपासून सुरू असलेला तणाव शुक्रवारी संपुष्टात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मुंबई उच्च न्यायालयाने मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. या याचिकेविरोधात बंडखोर शिंदे गटाकडूनही अर्ज करण्यात आला होता. तो न्यायालयाने फेटाळला. आता शिंदे गटा उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/mieknathshinde/status/1573018006048845824?s=20&t=ppJg7bGJxrF8d9gP7ywwPA

Maharashtra Cabinet Expansion Amit Shah Green Signal
Politics Shivsena Rebel BJP
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या  दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एकनाथ खडसे पुन्हा भाजपात? अमित शाहांशी फोनवरून चर्चा? खरं काय आहे? खडसेंनी दिली ही प्रतिक्रीया…

Next Post

पुण्यात ‘पाकिस्तान झिंदाबाद’, ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा; PFI कार्यकर्त्यांना अटक

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
Capture 50

पुण्यात 'पाकिस्तान झिंदाबाद', 'अल्लाहू अकबर'च्या घोषणा; PFI कार्यकर्त्यांना अटक

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011