मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय… खावटी अनुदान न देणार्या, एसटी कर्मचाऱ्यांना वार्यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… खोके सरकार आले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले…बजेटमध्ये भोपळा देणार्या सरकारचा धिक्कार असो… महागाई वाढवणार्या सरकारचा धिक्कार असो…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत जोरदार निदर्शने केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा बारावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर चूल रचत त्याच्यावर प्रतिकात्मक सिलेंडर ठेवून गॅस दरवाढ आणि महागाईचा निषेध केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा अकरावा दिवशी बुधवारी आमदारांनी खोदा पहाड, निकला चुहा… शेतकऱ्यांवर अन्याय करणार्या सरकारचा धिक्कार असो… बजेटचा डोंगर, निघाला उंदीर…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत अर्थसंकल्पावर जोरदार निदर्शने केली होती.
यात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर आजही हे आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडीचे आमदार सातत्याने सरकारच्या चुकीच्या धोरणांवर आक्रमक भूमिका घेत आहेत. आज विधानभवनाच्या पायर्यांवर चूल रचत त्याच्यावर प्रतिकात्मक सिलेंडर ठेवून गॅस दरवाढ आणि महागाईचा निषेध करण्यात आला.#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३ pic.twitter.com/fK2qjtv6Sb
— NCP (@NCPspeaks) March 16, 2023
Maharashtra Assembly Session MLA Agitation MVA MLA