India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

धक्कादायक! राज्यातील तब्बल ३ हजार महिला ओमानमध्ये अडकल्या; पुण्यातील ८५ जणांचा समावेश, लैंगिक अत्याचारही झाले

India Darpan by India Darpan
January 26, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मानवी तस्करीचे प्रमाण सध्या वाढले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड मधील 85 महिला व युवती ओमानमध्ये अडकल्या आहेत. महाराष्ट्रातील महिला व युवतींची संख्या अडीच ते तीन हजारावर आहे. नोकरीचे अमिष दाखवत व्हिसा व पासपोर्ट काढून घेतले गेले आहेत. या महिलांवर लैंगिक अत्याचार केले गेले. भारतीय दुतावासासोबत संपर्क साधून पाठपुरावा करून या महिलांना सोडवणे गरजेचे आहे, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या 30 व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, महिला व अत्याचार प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक दीपक पांडे,इंटरनॅशनल जस्टिस मशीनचे संचालक येसुदास नायडू,फेसबुक पॉलिसी लीड विभागाच्या प्रियांका जैन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी,राज्य महिला आयोगाच्या सदस्या अँड गौरी छाब्रिया, उत्कर्षा रुपवते, दीपिका चव्हाण हे उपस्थित होते.

चाकणकर पुढे म्हणाल्या की, संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी राज्य महिला आयोग सदैव तत्पर असून. आयोगापुढे नवी आव्हाने आहेत. कामाच्या ठिकाणी होणारा अत्याचार,सायबर गुन्हेगारी वाढली आहे त्यासाठी फेसबुकने सुरु केलेले ‘मिशन ई सुरक्षा’ कॅम्पेन महत्त्वाचे आहे. मागील पंढरपूरच्या वारीमध्ये राज्य महिला आयोगाने आरोग्य वारी आपल्या दारी उपक्रम सुरु केला. या सॅनिटरी नॅपकिन प्रथमच पुरवले.गेल्या 13 ते 14 महिन्यात आयोगाने विविध समस्या साडेदहा हजार केसेस दाखल केल्या त्यातील 9 हजारांहून अधिक केसेस निकाली काढल्या असेही श्रीमती रुपाली चाकणकर म्हणाल्या.

श्रद्धा वालकर हत्याकांड सारख्या घटना घडू नयेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मिसिंग सेल अॅक्टीव्ह होणे गरजेचे आहे.शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी दामिनी पथक व बीट मार्शल शाळेच्या आवारात ठेवा. पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीय पंथीयांचे स्वतंत्र विभाग सुरु केले आहे. 25 खाटांचे हा विभाग लवकर सुरू केला जावा अशी सूचनाही श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केली.

जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून काम करत असताना महिलांबाबतच्या खटल्यात संवेदनशीलतेने उल्लेखनीय कार्य केलेले पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे,पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख,विधवा प्रथा बंदीचा ठराव करत ऐतिहासिक पाउल उचलणारी हेरवाड ग्रामपंचाय तीचे सरपंच सूर गोंडा पाटील, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

राज्य महिला आयोग आणि मेटा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सुरक्षिततेकरिता राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला, आयोगाच्या वर्ष २०२३ च्या कॅलेंडर व डायरीचे प्रकाशन, राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बिल्डिंग ब्रिज या टुलकिट पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी यांनी प्रास्ताविक केले.महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन,महिला व अत्याचार प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक दीपक पांडे,इंटरनॅशनल जस्टिस मशीन चे संचालक येसुदास नायडू,फेसबुक पॉलिसी लीड विभागाच्या प्रियांका जैन, यांनी मनोगत व्यक्त केले.

तसेच महिला आयोग – फेसबुक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच फेसबुकची शासकीय यंत्रणेसोबत जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे.2/3 pic.twitter.com/yum1pujz9p

— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 24, 2023

Maharashtra 3000 Women’s Stuck in Oman Sexual abuse


Previous Post

कार्तिक आर्यन राहणार या अभिनेत्याच्या मुंबईतील घरात; भाडे ऐकून तोंडातच बोट घालाल!

Next Post

अरे च्या…‘व्हॅलेंटाईन डे’पूर्वी सर्व विद्यार्थिनींना बॉयफ्रेंड बंधनकारक! कॉलेजची नोटीस व्हायरल

Next Post
प्रातिनिधीक फोटो

अरे च्या...‘व्हॅलेंटाईन डे’पूर्वी सर्व विद्यार्थिनींना बॉयफ्रेंड बंधनकारक! कॉलेजची नोटीस व्हायरल

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group