त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवीन वर्षाच्या सुरुवातीला अर्थात सोमवारी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री व प्रभू त्र्यंबकराजाचे निस्सीम भक्त शिवराजसिंह चौहान यांनी भगवान त्र्यंबकेश्वराचे विधीवत दर्शन घेतले. भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण हे सहपरीवार दरवर्षी नववर्षाच्या सुरुवातीस येत असतात. चौहान यांच्या उपस्थितीमुळे मंदिर परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.
या वर्षी मध्य प्रदेशची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे शिवराज सिंह यांनी त्र्यंबकराजाला विजयाचे साकडे घातले. त्र्यंबकराजाच्या मंदिरात शिवराजसिंह चव्हाण यांनी सपत्निक पुजा अभिषेक करून आरती केली. यावेळी त्यांचे सोबत त्यांचे दोन्ही पुत्र कार्तिक व कुणाल होते. चौहाण यांनी सोवळे नेसुन गर्भगृहात जाऊन त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. पौरोहित्य वेदमुर्ती श्रीनिवास तथा वामन गायधनी यांचेसह सुयोग वाडेकर, तेजस ढेरगे, बाळासाहेब कळमकर, अक्षय शुक्ल, जयदीप शिखरे, सचिन दिघे, तन्मय वाडेकर, ऋतुराज जोशी यांनी केले. देवस्थान ट्रस्टतर्फे विश्वस्त प्रशांत गायधनी, अॅड. पंकज भुतडा, संतोष कदम यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व भगवान त्र्यंबकराजाची प्रतिमा देऊन सत्कार केला.
भाजपा कडून शहराध्यक्ष सुयोग वाडेकर, त्यांचे शाल, पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी भाजपा पदाधिकारी अॅड. श्रीकांत गायधनी, पंकज धारणे, रामचंद्र गुंड, युवा मोर्चा अध्यक्ष विराज मुळे, संकेत टोके, आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. अतिरिक्त पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उप अधिक्षक कविता फडतरे, पो.नि. संदीप रणदिवे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. अश्विनी टिळे, राणी डफळ, चंद्रभान जाधव व सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तहसिलदार दिपक गिरासे व सहकारी उपस्थित होते.
https://twitter.com/ChouhanShivraj/status/1609542900248940544?s=20&t=Wdw1PryQMqUoY5RFvq20Wg
Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan Trimbakeshwar Temple