इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थानच्या उदयपूरमध्ये गोमांसापासून बनवलेले चॉकलेट विक्री होत असल्याची घटना समोर आली आहे. शहरातील पोलीस नियंत्रण कक्षापासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावर बीफ जिलेटिनपासून बनवलेले चॉकलेट विकले जात होते. तक्रार मिळताच वैद्यकीय व आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गोमांसापासून बनवलेल्या सर्व चॉकलेट दुकानातून जप्त केल्या आहेत. हे चॉकलेट पाकिस्तानातून आयात करण्यात आले आहेत. आता विभाग शहरातील इतर दुकानांची तपासणी करण्यात व्यस्त आहे.
‘मेड इन पाकिस्तान’
मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूरच्या बाजारात ‘मेड इन पाकिस्तान’ लिहिलेल्या गोमांसापासून बनवलेल्या चॉकलेटची विक्री होत असल्याची तक्रार वैद्यकीय विभागाला मिळाली. त्यानंतर लगेचच अन्न निरीक्षकांचे पथक तपासासाठी पाठवण्यात आले. देहली गेट चौकातील चॉकलेट आणि बर्थडे डेकोरेशनच्या वस्तूंच्या दुकानातून गोमांसापासून बनवलेल्या चॉकलेटचे पॅकेट जप्त करण्यात आले. हे चॉकलेट मुंबईहून मागवल्याचे दुकानदार सांगतात. या दुकानातून हे चॉकलेट इतर दुकानांनाही पुरवण्यात आली आहे. त्याच्या पॅकेटवर ‘मेड इन पाकिस्तान’ असे लिहिले आहे.
विक्रीवर बंदीची मागणी
चॉकलेटच्या पॅकेटवर पत्ता ‘इस्माईल इंडस्ट्रीज लिमिटेड C-230, HITE हब, बलुचिस्तान, पाकिस्तानद्वारे निर्मित’ असा आहे. त्याच्या पॅकेटवर उर्दू भाषेत बरीच माहिती देण्यात आली आहे. पॅकेटच्या वरच्या लाल चिन्हावरून हे स्पष्ट होते की, ही टॉफी मांसाहारी आहे. ‘चिली-मिली’ नावाच्या या टॉफीच्या पाऊचची किंमत २० रुपये आहे. पाकिस्तानी टॉफी विकणे आणि त्यामध्ये गोमांस जिलेटिन असण्यालाही सर्वसामान्यांनी विरोध केला. तसेच त्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली.
नमुना प्रयोगशाळेत पाठवला
वैद्यकीय विभागाचे अन्न निरीक्षक अशोक गुप्ता सांगतात की, चॉकलेटवर बीफ जिलेटिन लिहिलेले असते. सीएमएचओ डॉ. आरएल बामनिया यांनी सांगितले की, एक दिवसापूर्वी एक व्यक्ती कार्यालयात आली आणि त्यांनी याबाबत तक्रार केली. त्याने मला नमुना दाखवला. त्यावर मी तातडीने अन्न निरीक्षकांना चौकशीसाठी पाठवले. घटनास्थळावरून चॉकलेट जप्त करून त्याचा नमुना घेतला. चॉकलेटवर मेड इन पाकिस्तान लिहिलेले होते आणि त्याच्या मजकुरावर बीफ जिलेटिन लिहिलेले होते. त्याचे नमुने संपूर्ण तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Made in Pakistan Chocolate Sale in India