औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात असे विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद येथे केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्र्यांनीच अशा पद्धतीचे सुतोवाच केल्याने दोन्ही निवडणुका एकाचवेळी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात केंद्रीय पातळीवरच काही हालचाली सुरू आहेत का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात नवनिर्वाचित भाजप सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात दानवे यांनी हे विधान केले आहे. गेल्या काही दिवसापासून मध्यावधी निवडणुकांची चर्चा होती. आता दानवे यांनी हे विधान केले आहे. यावेळी त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावाही केला आहे. दानवे हे भाजपचे जेष्ठ नेते आहे. त्यांचप्रमाणे त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्षपदही भूषविले आहे. त्यामुळे त्यांनी केलेले हे विधान राजकीय वर्तूळात चर्चेचे ठरले आहे.
https://twitter.com/raosahebdanve/status/1607433406740332545?s=20&t=iRbgV1p-lQZ1W4BIZVAoLw
Loksabha and Vidhansabha Election Same Time Indication
Union Minister Raosaheb Danve Aurangabad Politics