नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा सातवा दिवस असून विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईडी सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
शेतकरी हैराण सरकार खातो गायरान…
खोके लुटा कधी गायरान लुटा…
सुरतला चला कधी गुवाहटीला चला…
५० द्या कुणी ८२ द्या, शिंदे सरकारला द्या…
भूखंड घ्या कुणी गायरान घ्या…
सत्तारला द्या कुणी राठोडला द्या…
महाविकास आघाडी आमदारांनी टाळ वाजवत विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
शेतकरी हैराण सरकार खातो गायरान… खोके लुटा कधी गायरान लुटा… सुरतला चला कधी गुवाहटीला चला… ५० द्या कुणी ८२ द्या, शिंदे सरकारला द्या…भूखंड घ्या कुणी गायरान घ्या सत्तारला द्या कुणी राठोडला द्या… महाविकास आघाडी आमदारांनी टाळ वाजवत विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. pic.twitter.com/7NrOrxTo2Z
— NCP (@NCPspeaks) December 27, 2022
गद्दार बोलो कभी सत्तार बोलो…
राजीनामा द्या राजीनामा द्या,
भूखंडाचा श्रीखंड खाणारे राजीनामा द्या…
जनतेकडून पैसे घेणार्या अब्दुल सत्तार यांचा निषेध…
अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आजही भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या व सरकारच्या विरोधात आंदोलन केले.
आज हिवाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी सुरुवातीलाच सभागृहाच्या पायऱ्यांवर टाळांचा आवाज घुमला. 'मविआ' च्या आमदारांनी जोरदार भजनी आंदोलन करून सरकारची कानउघडणी केली. आता हा महाराष्ट्राच्या मातीतला आवाज महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळवून देणार! pic.twitter.com/y8wYSwN2SG
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) December 27, 2022
Opposition Leaders Agitation At Vidhan Bhavan Video
Maharashtra Legislative Assembly Session Nagpur
Agriculture Minister Abdul Sattar Resignation demand