India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

ओबीसींच्या प्रश्नासाठी कोणतेही सरकार आले तरी संघर्ष करावा लागतो; छगन भुजबळांनी व्यक्त केली खंत

India Darpan by India Darpan
December 25, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओबीसींच्या प्रश्नासाठी कोणतेही सरकार आले तरी आम्हाला संघर्ष हा करावाच लागतो असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी भवन नागपुर येथे व्यक्त केले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या बैठकीत ते बोलत होते,

यावेळी ते म्हणाले की गेले अनेक दिवस प्रलंबित असलेला पुण्यातील भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करून स्मारक उभे करणे आणि फुले वाड्याचा विस्तारीकरणाचा प्रश्न आम्ही मार्गी लावला आहे. यासाठी समता परिषद आणि बाबा आढाव यांनी उपोषण केले होते त्यामुळे सरकार सोबत मी बैठक घेतल्या.हा प्रश्न दोन महिन्यात मार्गी लावण्याच्या सूचना मी दिल्या त्याच प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत अशी माहिती त्यांनी दिली…

ओबीसींची जातीय जनगणना आपण केली पाहिजे अशी आपली मागणी जुनीच आहे. ओबीसींच्या जनगणनेच्या इतिहासाची आठवण त्यांनी यावेळी उपस्थितांना करून दिली. जनगणना करण्याची मागणी ही समीर भुजबळ यांनी संसदेत केली आणि त्याला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, शरद पवार यांच्यासह अनेकांनी पाठींबा दिला. जनगणना करण्याचे आश्वासन मिळाले. सुप्रीम कोर्टात प्रकरण असताना केवळ सरकारच्या आश्वासन असल्यामुळे आम्ही केस मागे घेतली मात्र त्यावेळी जनगणना ही जनगणना आयुक्त मार्फत न होता नगरविकास आणि ग्रामविकास विभाग यांच्यामार्फत केली गेली मात्र त्या जनगणनेची आकडेवारी आली नाही.

मधल्या काळात राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. तो महाविकास आघडीनेच सोडविला. जे जे शक्य होते ते ते प्रयत्न आम्ही त्याकाळी केले आणि म्हणूनच आज राजकीय आरक्षण पूर्ववत झाले आहे. आजही अनेक मागण्या ओबीसी समाजाच्या आहेत राज्याच्या अधिवेशनात आम्ही हे प्रश्न मांडूच मात्र जेव्हा जेव्हा गरज असेल तेंव्हा तेंव्हा आपण ओबीसींसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी ठेवली पाहिजे. संघटित राहून या सरकारला ओबीसींनी आपली ताकद दाखवून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले….

Leader Chhagan Bhujbal on OBC Issues


Previous Post

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने औरंगाबादेत स्वच्छता मोहिम; ७४ हजार स्वयंसेवकांनी संकलित केला ७४८ टन कचरा

Next Post

नंदुरबार कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी घेतले हे महत्त्वाचे निर्णय

Next Post

नंदुरबार कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी घेतले हे महत्त्वाचे निर्णय

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group