इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रह महत्त्वाचे असून प्रत्येक ग्रहाचे आपले वेगळे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलतो. ग्रहांच्या या राशी परिवर्तनाने शुभ आणि अशुभ योग तयार होतात. वैभव आणि ऐश्वर्य देणारा शुक्र हा ग्रह आणि बुद्धिमत्ता व व्यवसायाचा दाता मानला जाणार बुध ग्रह यांनी वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. परंतु, मकर, कुंभ आणि तुळ या ३ राशींना याचा सर्वाधिक लाभ होणार आहे, असे दिसून येते. आता हा लाभ कसा होईल हे जाणून घेऊया…
मकर
मकर राशीच्या नागरिकांसाठी लवकरच लक्ष्मी नारायण योग फायदेशीर ठरू शकतो. हा योग मकर राशीतून अकराव्या घरात तयार होणार आहे. तसेच ते उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते. सहाजिकच या योगामुळे उत्पन्नात वाढ होऊ शकते. यासह उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील निर्माण होऊ शकतात. इतकेच नव्हे तर शेअर मार्केटमधून देखील लाभ मिळण्याची शक्यता आहे. जुन्या किंवा नवीन व्यवहारात फायदा होईल. या काळात आर्थिक लाभासह कोणतीही मनोकामना पूर्ण होऊ शकते. त्यामुळे या राशीतील नागरिकांचा चांगलाच फायदा होणार आहे.
कुंभ
करिअर व व्यवसायात देखील चांगले पैसे मिळू शकतात. ग्रहांच्या संक्रमणामुळे पारगमन कुंडलीत दहाव्या भावात हा लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. ज्याला वर्कस्पेस आणि जॉब लोकेशन म्हणतात. त्यामुळे बेरोजगारांना यावेळी नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच तुम्ही वाहन किंवा इतर कोणत्याही वस्तू खरेदी करू शकता. यासोबतच जीवनात सुख-समृद्धी येईल. त्याचप्रमाणे कार्यक्षेत्रात काही नवीन जबाबदारी देखील मिळेल, म्हणजे एक प्रकारे त्यांचा चांगला फायदा होऊ शकतो.
तूळ
तूळ राशीच्या दुसऱ्या घरात हा योग्य तयार होत आहे. ज्याला धन आणि वाणीचे स्थान म्हणतात. लक्ष्मी नारायण राज योगामुळे या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात पैसे गुंतवण्यासाठी हा काळ शुभ मनाला जातो. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये अचानक वाढ होऊ शकते. दुसरीकडे अडकलेले पैसे देखील मिळू शकतात. तसेच एखाद्याकडे कर्जाचे पैसे अडकले असतील तर ते सुद्धा परत मिळू शकते.
LaXmi Narayan Yog Astrology Horoscope New Year 2023
Scorpio Zodiac Sign Tul Kumbha Makar