India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

…म्हणून नर्तिका गौतमी पाटील भडकली

India Darpan by India Darpan
December 30, 2022
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नर्तिका गौतमी पाटील हिचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. सोशल मीडियावरही तिला फॉलो करणारे अनेक आहेत. मात्र, तिच्या नृत्यादरम्यान ती करत असलेल्या अश्लील हावभावांमुळे ती अडचणीत आली होती. तेव्हा तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली होती. या सगळ्या गोंधळात अजून एक प्रकार घडला. सांगलीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बरीच गर्दी झाली होती. त्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली. भरीस भर म्हणून हा कार्यक्रम ज्या शाळेत आयोजित केला होता, त्याची कौलेही लोकांनी वाटेल तशी गर्दी केल्याने फुटली. या सगळ्या प्रकारानंतर गौतमीच्या अडचणीत वाढच झाली. दरम्यानच्या काळात गौतमीने घडलेल्या प्रकाराबद्दल प्रेक्षकांची माफीही मागितली. आता पुन्हा तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी होते आहे. यावर मात्र तिचा संयम सुटला आहे. आणि तिने माझ्या नृत्यात अश्लीलता नाही, असे म्हणत कार्यक्रम बंद करणार नसल्याचे सांगितले.

गौतमी पाटील हिच्या व्हिडिओवर अक्षरशः लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत असतो. सोशल मीडियावर गौतमी पाटील हिचे अनेक व्हिडिओ, रील्स शेअर केले जात आहे. तरुणाईला गौतमी पाटील हिने अक्षरशः वेड लावलं आहे. गौतमी पाटीलवर अश्लील हावभाव करून लावणी करत असल्याचा आरोप अनेक कलाकारांनी केला असून तिच्या कार्यक्रमांवर बंदी घाला अशी मागणी केली जात आहे. अनेक लावणी कलाकारांनी गौतमी पाटीलवर नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपासून गौतमी पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. तिच्या कार्यक्रमांवर बंदी घाला म्हणून मागणी केली जात आहे. तिच्या कार्यक्रमांना ठिकठिकाणी विरोध केला जात असल्याचेही समोर आले आहे. मात्र, गौतमी पाटील हिने केलेल्या अश्लील हावभावावर जाहीर माफी मागितली होती, त्याबाबत व्हिडिओ देखील शेअर केला होता.

माफी मागितल्यानंतरही कार्यक्रम बंदीची मागणी होत असल्याने गौतमी पाटील भडकली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने आपले मत स्पष्टपणे व्यक्त केले आहे. माझ्या कार्यक्रमांना विरोध का केला जातोय मला माहिती नाही. त्यामुळे माझ्या कार्यक्रमांवर बंदी आणण्याचं काही कारण नाही, असं गौतमीच म्हणणं आहे.

माझ्या नृत्यात कुठेही अश्लीलता नाही, आधी जे झालं त्याबाबद्दल मी माफी मागितली आहे. लोकांचं माझ्यावर आणि माझ्या कार्यक्रमांवर प्रेम आहे त्यामुळे माझ्या कार्यक्रमांना गर्दी होत असते. कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी कितीही होत असली तरी, पुढच्या महिन्यापर्यंत माझ्या तारखा बुक असून लवकर माझा मराठी चित्रपट आणि नवीन लावणी येत आहे, असंही गौतमी पाटील हिने सांगितलं आहे. गौतमीला महाराष्ट्राची सपना चौधरी म्हणण्यावरही तिने आपले मत व्यक्त केले आहे. मला जर सपना चौधरी म्हणत असतील तर ते चांगलेच आहे. कारण हे नाव खूप मोठं आहे. आणि यावर तिलाही काही आक्षेप असेल असं वाटत नाही, असं गौतमी सांगते.

Lavani Dancer Gautami Patil Angry And Says


Previous Post

यंदा सोन्याचा परतावा कमी का मिळाला? बघा, तज्ज्ञ काय सांगताय

Next Post

या जिल्ह्यात चक्क शिक्षकांच्या मान्यतेचे निघाले बनावट आदेश; शिक्षण मंत्री म्हणाले…

Next Post

या जिल्ह्यात चक्क शिक्षकांच्या मान्यतेचे निघाले बनावट आदेश; शिक्षण मंत्री म्हणाले...

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023

पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

March 24, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर

March 24, 2023
प्रातिनिधीक फोटो

इन्फ्लूएंझा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर

March 24, 2023

गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी; तब्बल ७० लाखांना गंडा

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group