बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

निफाड तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ; प्रांत डॉ.अर्चना पठारे यांनी घेतली तातडीची बैठक

by India Darpan
जानेवारी 14, 2022 | 9:07 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220114 WA0457

लासलगाव – निफाड तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी खाजगी असस्थापनात ५० टक्के उपस्थितीची मर्यादा न पाळणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई, नो वक्सिन नो एंट्री या प्रणालीचे सक्तीने पालन व लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तातडीने निर्देश देण्यात आले असून दररोजच्या कामकाजाचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती निफाडच्या प्रांत डॉ.अर्चना पठारे यांनी दिली.

निफाड तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्या मुळे आज निफाडच्या उपविभागीय महसूल अधिकारी डॉक्टर अर्चना पठारे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून निफाड तालुक्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी ,तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विविध आरोग्य अधिकारी व महसूल विभागाचे सर्कल ऑफिसर ,तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांची तातडीने बैठक घेऊन पन्नास टक्क्यापेक्षा अधिक उपस्थितीचे निकष न पाडणाऱ्या खासगी आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच तातडीने तालुक्यातील लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास प्रांत डॉ. अर्चना पठारे यांनी ही बैठक आयोजित केली.

या बैठकीत गेल्या सप्ताहात १२० असणारी कोरोना रुग्णसंख्या ४२६ इतकी पोहोचली आहे. व ती नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. परंतु चिंताजनक रुग्ण नाही ही प्रशासनाला समाधानाची बाब असली तरी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.या बैठकीत बोलताना प्रांत डॉ.अर्चना पठारे यांनी पहिला डोस घेतलेल्या लसीकरण नागरिकांची संख्या ८५ टक्के असून दुसऱ्या टक्के दुसरा डोसचे प्रमाण ५६ टक्के इतके आहे त्यामुळे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पहिला डोसचे पंधरा टक्के लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे व दुसऱ्या दोसचे ४४ टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे आदेश दिले. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस घेण्यासाठी दररोज स्थानिक आरोग्य अधिकारी सक्षम यंत्रणा उभी करणे व पहिला डोस घेतलेला नागरिकांशी संपर्क साधून लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणे याचा दररोज प्रगती अहवाल तालुका आरोग्य अधिकारी यांनी देण्याचे आदेश दिले आहेत.

शासनाच्या निर्देशानुसार शासनाच्या निर्देशानुसार निफाड तालुक्यात रुग्ण संख्या पाहता विवाह समारंभात ५० अंतयात्रा कार्यक्रमात २० लोकांची उपस्थिती बाबत स्थानिक प्रशासनाने धडक मोहीम राबवून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शासनाच्या निर्देशानुसार ५० टक्के उपस्थितीचे आदेश खाजगी आस्थापनांनी पाळणे गरजेचे असूनही ज्या अस्थापनाचे प्रमुख या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यांच्यासह निर्बंध तोडणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करावी असे निर्देश प्रांत डॉक्टर अर्चना पठारे यांनी दिले.
निफाड तालुक्यातील ओझर बरोबरच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड तसेच बाजार आवारामुळे शेतकरी वर्गाची गर्दी होते ही बाब पाहता कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी बाजार आवरावर देखील कोरोणा संख्या आटोक्यात होण्यासाठी दिलेले निर्देश पूर्ण होतात की नाही याबाबत लक्ष ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी महसूल मंडळ अधिकारी, ग्राम विकास अधिकारी यांनी प्रतिबंधक झोन बाबत तातडीने लक्ष घालून कोरीना रुग्ण होम आईसोलेटेड आहेत की नाही याचे दररोज अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याबाबत बोलताना प्रांत डॉ.अर्चना पठारे यांनी निफाड तालुक्यातील कोरोंना संख्या वाढते ही चिंताजनक बाब आहे शासनाने पिंपळगाव येथील कोरोना उपचार केंद्रात कोविड सेंटर येथे २०० बेडचे ऑक्सिजनचा उपचार सुविधा आहे ,त्यात केवळ सात ते आठ पेशंट रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण संख्या वाढत असली तरी पेशंट खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. संभाव्य रुग्णांची संख्या वाढत असल्याचे लक्षात घेऊन पिंपळगाव बसवंत येथील दोनशे बरोबरच निफाड येथील रसलपुर येथे १०० खाटांचे कोरोना उपचार केंद्रास मान्यता आली आहे. लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील तीस खाटांची रुग्णाची उपचाराची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. पिंपळगाव बसवंत निफाड, लासलगाव, तीन ठिकाणी ऑक्सिजन व्यवस्था पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर चांदोरी व खडक माळेगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रातील ऑक्सीजन संयंत्राची निर्मिती झाली आहे शासनाच्या आदेशानुसार सर्व कोरूना प्रतिबंधक कारवाई करण्याची उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत व त्याचे अहवाल देखील देण्याचे आदेश देण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले या व्हिडिओ कॉन्फर्सद्वारे बैठकीस निफाडच्या पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे, नाशिकचे पोलीस उपअधीक्षक भोसले उपस्थित होते. निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, निफाडचे गट विकास अधिकारी संदीप कराड ,तालुका संपर्क अधिकारी डॉक्टर चेतन काळे ,निफाड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुजित कोशिरे, यांच्यासह यांच्यासह तालुक्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोना मृतांच्या वारसांना मदतः १२ हजार अर्जांपैकी आतापर्यंत केवळ ५३६६ अर्जच मंजूर

Next Post

नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

India Darpan

Next Post
carona

नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011