नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. लासलगाव व निफाड हे कांद्याचे आगार म्हणून ओळखले जातात. या परिसरात मोठ्या प्रमाणावर कांद्याची पीक घेतले जाते, तसेच या दोन्ही बाजार समितीमध्ये जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्या बाहेरील देखील कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होऊन लीलाव होतात. त्याचप्रमाणे आता येथे टोमॅटो पिकाचेही लिलाव होणार आहेत.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो लिलावाला शुभारंभ करण्यात आला. बाजार समितीत टोमॅटोचे विक्री उघड लिलावाद्वारे होत असून स्थानिक अडत्यांबरोबर अनेक परप्रांती व्यापारी लिलावात सहभाग घेत असल्याने स्पर्धात्मक लिलाव झाल्याने आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळते आहे. विक्री उघड लिलाव झाल्यामुळे एक स्पर्धा निर्माण झाली आणि याचा थेट फायदा हा शेतकऱ्यांना झाला आहे.
लासलगावसह परिसरातील निफाड, चांदवड, येवला, सिन्नर व कोपरगाव या तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो या पिकाची लागवड केलीयं. लासलगाव जरी कांद्यांसाठी प्रसिध्द असले तरी येथील शेतकऱ्यांनी कांद्यासोबतच टोमॅटोचे पीक घेतले आहे. टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड केली असल्याने त्यांची मालविक्रीची सोय व्हावी म्हणून आशिया खंडातील अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आता टोमॅटोचा लिलाव देखील सुरू झाला आहे.
जास्त उत्पन्न झाले तर बर्याचदा टोमॅटो रस्त्यावर टाकायची वेळ येते. परंतु जर आपण सध्याच्या बाजारपेठेचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचे लिलाव सुरू झाले आहेत. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या लिलावाला शुभारंभ झाला असून उघड लिलावाच्या माध्यमातून टोमॅटोची विक्री होत असून स्थानिक व्यापारी आणि राज्यातील व्यापाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतल्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन त्याचा फायदा शेतकरी बंधूंना होताना दिसत आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या झालेल्या लिलावामध्ये 20 किलोच्या एका क्रेटला 351 रुपये म्हणजेच एकंदरीत सरासरीचा विचार केला तर तीनशे रुपये प्रती क्रेट इतका भाव मिळाला. टोमॅटो लिलावास शेतकरी अडते व व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने तसेच बाजारभाव ही चांगले असल्याने टोमॅटो उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
Lasalgaon Agriculture Produce Market Auction
Asias Biggest Onion Market Nashik Tomato Farmer Agri