इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जमिनीच्या मोबदल्यात नोकरी घोटाळाप्रकरणी राष्ट्रीय जनता दल प्रमुख, माजी रेल्वेमंत्री व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांशी संबंधित मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकले. यामध्ये ईडीने डॉलर, सोनेनाणे आणि मोठ्या प्रमाणात रोख जप्त केल्याची माहिती आहे.
नोकरी घोटाळा हा संपुआच्या कार्यकाळात झाला होता. त्यावेळी लालूप्रसाद यादव हे केंद्रात रेल्वेमंत्री होते. संपुआ सरकारच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजेच २००४ ते २००९ दरम्यान रेल्वेच्या विविध विभागांमध्ये ‘ड’ वर्गातील विविध व्यक्तींच्या नियुक्ती करण्यात आल्या होत्या. या नियुक्तींच्या बदल्यात जमीन संबंधित उमेदवारांनी लालूप्रसाद यादव, त्यांचे कुटुंबीय आणि एके इन्फोसिस्टम्स प्रा. लिमिटेडला जमीनी हस्तांतरित केल्या होत्या. या प्रकरणात आता ईडीने कारवाई सुरू केली आहे. त्या अंतर्गत ही छापेमार कारवाई करण्यात आली.
लालूप्रसाद यादव यांच्या तीन मुली आणि आरजेडीच्या काही नेत्यांच्या घरी ईडीने छापे टाकलेत. त्यात ५३ लाख रुपये रोख, १९०० अमेरिकी डॉलर, सुमारे ५४० ग्रॅम सोने, दीड किलो सोन्याचे दागिने असा ऐवज प्राप्त झाला. या कारवाईतंर्गत दक्षिण दिल्लीतील एका घरी छापे टाकण्यात आले. तिथे लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव उपस्थित होते. हे घर एके इन्फोसिस्टम्स प्रा. लिमिटेडच कंपनीचा नोंदणीकृत पत्ता आहे, असल्याची माहिती पुढे आली आहे.
यांचा होता कारवाईत समावेश
प्राप्त माहितीनुसार, पाटणा, फुलवारी शरीफ, दिल्ली एनसीआर, रांची आणि मुंबई येथील लालूप्रसाद यांच्याव यांच्या कन्या रागिनी यादव, चंदा यादव, हेमा यादव यांच्या मालमत्तांवर तसेच राजदचे माजी आमदार अबू दोजाना, अमित कत्याल, नवदीप सरदाना आणि प्रवीण जैन यांच्या निवासस्थानांवर ही कारवाई झाली.
Lalu Prasad Yadav Family ED Raid Seized Money Gold