दिडोंरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील लखमापूर शिवारात एका कंपनीतील रिकाम्या हौदात जंगली मांजर सदृश्य प्राणी दिसला होता. तेथील कामगारांच्या लक्षात येताच तेथील समाधान सोनवणे यांनी वणी येथील प्राणी मित्र भगवान पवार यांना पाचारण करण्यात आले. पवार त्या ठिकाणी जाऊन रिकाम्या हौदात उदमाजंर सदृश्य वन्य जीव दिसून आले. दोन दिवसा पासून हा वन्य प्राणी पडलेला होता. पवार यांनी अलगद प्लास्टिक गोणीच्या सहाय्याने अलगद पकडले. पवार यांनी याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. वणी वनविभागाचे कर्मचारी, वणी पोलीस ठाण्याचे पो.उप निरि.प्रविण उदे,वणी विभागाचे कर्मचारी आण्णा टेकनर, तसेच काही ग्रामस्थ श्यामराव सोनवणे यांच्या उपस्थितीत वणी येथील जंगलात या उद मांजरास सुरक्षीत सोडून देण्यात आले. उदमांजर हा अतिशय दुर्मीळ वन्य प्राणी आहे. या परिसरात वन्य जीव मित्र भगवान पवार यांनी याबाबत माहिती दिली.