गुरूवार, मे 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लंडनच्या विद्यापिठात नाशिक जिल्ह्यातील क्षितिजा भास्कर कदम एमबीए (डिजिटल मार्केटिंग) परीक्षेत प्रथम

by India Darpan
नोव्हेंबर 5, 2022 | 11:04 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20221105 WA0182 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लंडन येथील नॉटिंहम ट्रेंट विद्यापिठात नाशिक जिल्ह्यातील क्षितिजा भास्कर कदम यांनी एमबीए (डिजिटल मार्केटिंग) परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल नॉटिंहम विद्यापीठातर्फे पदवीदान समारंभात विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

क्षितिजा कदम यांना पूर्णवेळ एमबीए प्रोग्राम अंतिम परीक्षक मंडळाचे निकाल विद्यापीठाचे प्रशासक जॅम केली यांनी पत्राद्वारे कळविला असून त्यात नमूद केले आहे की, एमबीए (डिजिटल मार्केटिंग) अभ्यासक्रमाचा अभ्यास यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन. “एमबीए एक्सलन्ससाठी एनबीएस डीनचे पारितोषिक” देखील प्रदान केले आहे. पदवीदान समारंभात पारितोषिक वाचन केले जाईल तसेच ग्रॅज्युएशन ब्रोशरमध्ये आपले नाव व तपशील समाविष्ट केला जाईल. याचबरोबर आम्ही तुम्हाला योग्यवेळी बक्षीस आणि प्रमाणपत्र पाठवू. तुमच्या अतुलनीय कामगिरीबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन.

क्षितिजा कदम या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील मूळ रहिवाशी असून त्या माजी नगराध्यक्ष भास्कर कदम यांच्या कन्या आहेत. क्षितिजा कदम यांचे संपूर्ण शिक्षण हे मराठी माध्यमात झाले आहे, हे विशेष उल्लेखनीय होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण छाजेड विद्यालय, व्ही. जे. हायस्कुल तसेच कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथे झाले. तसेच महाविद्यालयीन शिक्षण नाशिकच्या केटीएचएम मध्ये झाले आहे. याकाळात संस्थाचालक, शिक्षक, प्राध्यापक यांचे मार्गदर्शन तिला लाभले.

याचबरोबर क्षितिजा कदम यांनी पुणे येथील रानडे इन्स्टिट्यूटमधून एमए एमसीजे ही पदवी विशेष प्रविण्यासह मिळविली. प्रारंभी पुणे येथील एका मीडिया मॅनेजमेंट कंपनीत काम केले. त्यानंतर मुंबई येथे जेनिसिस या कंपनीत काम करीत असतांना प्रो कबड्डीचे मीडिया मॅनेजमेंटची जबाबदारी तिने यशस्वीरित्या पार पाडली. तसेच भारतातील ऍड फॅक्कर नामांकित जाहिरात एजन्सीमध्ये काम केले. तेथूनच तिने नॉटिंगम विद्यापीठात एमबीए (डिजिटल मार्केटिंग) साठी स्कॉलरशिपसह प्रवेश मिळविला. नॉटिंगम विद्यापीठाचे इस्तंबूल येथे प्रतिनिधित्व करण्याचा विशेष सन्मानही क्षितिजा कदम मिळाला. तेथे ३० देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. क्षितिजा कदम या मराठमोळ्या विद्यार्थींनीने इंग्लंडमध्ये अतुलनीय यश मिळविल्या बद्दल तिचे विशेष कौतुक केले जात आहे.
IMG 20221105 WA0181

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बांधकाम साईटवर बिगारीशी वाद, वॅाचमनचा खून

Next Post

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर शालिग्राम एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग

Next Post
20221105 110943

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर शालिग्राम एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग

ताज्या बातम्या

image001BXCD

केंद्रीय मंत्री गडकरी गोव्यात प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचे करणार भूमीपूजन…ही आहे वैशिष्ट्ये

मे 22, 2025
financeHAQQ

मुंबई विमानतळावर ९० हजार अमेरिकन डॉलर्स रोकड‌ आणि सुमारे २२ लाख रुपयांचे सोने जप्त

मे 22, 2025
499781781 1138516098320748 6199252395145758472 n

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

मे 22, 2025
rain1

राज्यात या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मध्यम जोरदार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 22, 2025
modi 111

महाराष्ट्रातील या १५ अमृत भारत स्टेशनांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन…

मे 22, 2025
mahavitarn

सायबर भामट्यांनी महावितरणची केली बनावट वेबसाईट…महावितरणने केली ही तक्रार

मे 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011