India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कोण होणार करोडपतीचं नवं पर्व; २ करोड रुपये जिंकण्याची संधी ! सहभागी होण्यासाठीची प्रक्रिया या तारखेपासून सुरू होणार

India Darpan by India Darpan
February 28, 2023
in संमिश्र वार्ता
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – करोडपती होण्याचं स्वप्न प्रत्येक जण पाहतो, पण सर्वसामान्यांचं हे स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी सोनी मराठी वाहिनी पुन्हा एकदा घेऊन आली आहे. स्वबळ आणि ज्ञान यांच्या मदतीने मिळणार्‍या यशाची चव चाखण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हा. कारण लवकरच येतंय कोण होणार करोडपती चं पुढचं पर्व. धनलक्ष्मी, प्रतिष्ठा आणि प्रेक्षकांची मनं जिंकण्याची हीच वेळ आहे. कोण होणार करोडपती या जगद्विख्यात कार्यक्रमाच्या या पर्वामध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया आता सुरू होते आहे. या वर्षी स्पर्धकांना १ मिस्डकॉल देऊन दोन करोड रुपये जिंकण्याची संधी आहे.

सोनी मराठी वाहिनीवर कोण होणार करोडपती हा मराठी रिॲलिटी शो अल्पावधीतच लोकप्रिय ठरला. मनोरंजनासह ज्ञानार्जन हे वैशिष्ट्य असणार्‍या या कार्यक्रमात अवगत असलेलं आणि मिळवलेलं ज्ञान तुम्हांला यशाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाऊ शकतं, याची प्रचिती मागच्या पर्वांमधून सगळ्यांना आली आहे. या कार्यक्रमामध्ये आलेल्या स्पर्धकांची स्वप्नपूर्ती झाली आहे. प्रत्येक घरासाठी आणि घरातील प्रत्येकासाठी सोनी मराठी वाहिनी हि संधी घेऊन येत आहे.

कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत. सचिन खेडेकर उत्तम अभिनेते आहेतच, पण स्पर्धेतल्या स्पर्धकांशी प्रेमळ संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचं कामही ते मोठ्या कौशल्यानी करतात. त्यामुळे स्पर्धेतले सहभागी स्पर्धक अधिक आत्मविश्वासानी आणि चांगल्या प्रकारे खेळू शकतात. या वर्षी सहभागी होण्यासाठी उत्सुक असलेल्या स्पर्धकांना १४ दिवसांत १४ प्रश्न विचारण्यात येणार आहेत. जितके जास्त प्रश्न तितक्याच जास्त संधी. कोण होणार करोडपती या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी २ मार्चपासून नोंदणी सुरू होते आहे. २ मार्चपासून १५ मार्चपर्यंत रोज एक प्रश्न, असे १४ प्रश्न विचारले जाणार आहेत. ७०३९०७७७७२ या क्रमांकावर मिस्डकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षकांना नोंदणी करता येईल. सोनी मराठी वाहिनीने कोण होणार करोडपती या कार्यक्रमाद्वारे १ मिस्डकॉल देऊन २ करोड जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

करोडपती होण्याचं तुमचं स्वप्न आता खऱ्या अर्थानं साकार होऊ शकतं. २ मार्चपासून १५ मार्चपर्यंत रोज एक प्रश्न. ज्ञान, मनोरंजन आणि रसिक प्रेक्षकांचं प्रेम मिळवण्यासाठी तयार राहा, कारण सोनी मराठी वाहिनी लवकरच घेऊन येणार आहे, कोण होणार करोडपती !


Previous Post

‘दावोस’च्या या अडीच दिवसांच्या दौऱ्यासाठी राज्याच्या तिजोरीतून ४० कोटी रुपयांची उधळपट्टी का; अजित पवार

Next Post

जी २० परिषदेच्या ट्रेड ॲन्ड इन्व्हेस्टमेंट वर्किंग ग्रुपच्या या तारखेला मुंबईत बैठका

Next Post

जी २० परिषदेच्या ट्रेड ॲन्ड इन्व्हेस्टमेंट वर्किंग ग्रुपच्या या तारखेला मुंबईत बैठका

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group