India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

बारसू आंदोलन पेटले! पोलिसांचा सौम्य लाठीमार… आंदोलकांचा संयम संपला… मुख्यमंत्री म्हणाले…. (बघा व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
April 28, 2023
in Short News
0

 

रत्नागिरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)  – बारसू रिफायनरी प्रकल्पाचे आंदोलन आता चांगलेच पेटलेले आहे. आज या आंदोलनाने असे काही रुप घेतले की पोलिसांनी परिसरात १४४ कलम लागू केले. हा विषय आता केवळ कोकणापुरता मर्यादित राहिलेला नसून राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी यात उडी घेतली आहे. आंदोलकांचा संयम संपल्याने पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला आहे. तसेच, अश्रूधाराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता हे आंदोलन पेटल्याचे दिसून येत आहे.

बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना प्रशासनाने तुरुंगात टाकण्याचा प्रकार सुरू केला आहे, अशी तक्रार गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. यासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन प्रश्न मांडला होता. त्यानंतर असे काहीही होत नाहीये हे मंत्र्यांनी स्पष्ट केले होते. पण, आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आज आंदोलन केले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोकणातील बारसू रिफायनरीच्या विरोधात तेथील स्थानिक नागरीकांनी आंदोलनाची भूमिका घेतली असताना त्यांच्यावर राज्य सरकार पोलीस बळाचा वापर करीत आहे. पोलीसांच्या लाठीमारात काही आंदोलक जखमी झाल्याचे समजते.शासनाने बळाचा वापर करण्यापेक्षा स्थानिक नागरीक व इतर घटकांशी चर्चा करुन याबाबत तोडगा… pic.twitter.com/SCazawos7N

— Supriya Sule (@supriya_sule) April 28, 2023

या आंदोलनात विनायक राऊत यांच्यासह सहभागी होण्यासाठी स्थानिक महिला व युवक मोठ्या प्रमाणात तिथे आले होते. आंदोलनकर्त्यांनी सर्वेक्षण सुरू असलेल्या ठिकाणी शिरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. आंदोलकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. एवढ्यावर लोक थांबले नाहीत म्हणून पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. बऱ्याच वेळानंतर पोलिसांना बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांना थोपविणे शक्य झाले.

संजय राऊत यांनी शेअर केला व्हिडिओ

मुख्यमंत्री महोदय हे चित्र काळजी पूर्वक पहा.
बारसु येथे झालेल्या निघृण लाठी हल्ल्याचे हे चित्र.आपण म्हणता लाठचार्ज झालाच नाही.अशी माहिती आपणास जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची हिम्मत तुमच्यात आहे काय?शिवरायांचा… https://t.co/A4C5XYdHeU

— Sanjay Raut (@rautsanjay61) April 28, 2023

आंदोलनकर्त्यांची प्रकृती ढासळली
पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला. त्यामुळे काहींची प्रकृती ढासळली. त्याचवेळी लाठीचार्ज सुरू असल्यामुळे सगळ्यांची पळापळ झाली. यात अश्रुधुरामुळे लोकांना समोरचे दिसत नव्हते. काहींच्या डोळ्यांना दुखापतही झाली.

शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक
प्रशासनाचा स्थानिकांशी संवाद सुरू आहे. पण तरीही काहींनी शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण सुरू केले आहे. सरकार चर्चेसाठी कायमच तयार आहे. शेतकऱ्यांना डावलून आम्ही काहीही करणार नाही. त्यांच्या मनातील शंका दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले (बघा व्हिडिओ)

पत्रकारांशी संवाद https://t.co/QzmOra5Foj

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 28, 2023

Kokan Barsu Agitation Police Lathi charge Video


Previous Post

चिंतानजक! एप्रिल संपत आला तरी अवकाळीचा इशारा कायम; राज्याच्या या भागाला सतर्कतेचा इशारा

Next Post

सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील १९ नागरिक मायभूमीत दाखल

Next Post

सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील १९ नागरिक मायभूमीत दाखल

ताज्या बातम्या

डिप्लोमा इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू…. येथे करा अर्ज… यंदा अशी राहणार प्रक्रिया

May 31, 2023

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात; यासाठी घेतले पाच हजार

May 31, 2023

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

May 31, 2023

या व्यक्तींनी आज वादाचे प्रसंग टाळावेत; जाणून घ्या, गुरुवार, १ जून २०२३चे राशिभविष्य

May 31, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – १ जून २०२३

May 31, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा-बायको

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group