India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

के. के. वाघ शिक्षण संस्थेत नियमित कर्मचाऱ्यांची गैरमार्गाने सेवासमाप्ती

India Darpan by India Darpan
October 13, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील मोठ्या शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या के के वाघ शिक्षण संस्थेत अनागोंदा कारभार सुरू असल्याची बाब समोर आली आहे. संस्थेने नियमित कर्मचारी असलेल्या तीन प्राध्यापकांची गैरसार्गाने सेवासमाप्ती केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी संस्थेने सेवासमाप्त केलेल्या प्रा. संदीप गुंजाळ यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट टाकून मोठा खुलासा केला आहे.

प्रा. संदीप गुंजाळ यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की,
के. के. वाघ शिक्षण संस्था ही एके काळी महाराष्ट्रात नावाजलेली संस्था होती परंतु माघील काही वर्षांपासून संस्थेचा कारभार हा अतिशय अंधाधुंद पद्धतिने चालला आहे. सदरच्या संस्थने कुठलीही पूर्वसूचना न देता के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील ३ नियमित शिक्षकांची जून २०२२ मध्ये सेवा समाप्ती केली. या तीन शिक्षकांमध्ये प्रा. संदीप गुंजाळ, प्रा. मंगेश खालकर आणि प्रा. वैभव गायकवाड यांचा समावेश आहे. सदरच्या संस्थेमध्ये हे सर्व शिक्षक नियमित कर्मचारी होते आणि त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची मान्यता होती.

परंतु, के. के. वाघ शिक्षण संस्था नाशिक यांनी सदरच्या शिक्षकांना कुठलीही पूर्व सूचना न देता दि. २२ जून २०२२ रोजी सेवासमाप्तीची ऑर्डर दिली. सदरची सेवासमाप्ती ऑर्डर हि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी के. के. वाघ शिक्षण संस्था नाशिक याना दि. १७ जानेवारी २०२२ (संदभें क्र. सीए/५१) रोजी दिलेल्या पत्राचे उल्लन्घन आहे. तसेच सदरची सेवासमाप्ती हि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२१ चे उल्लन्घन आहे. तसेच, सदरची सेवासमाप्ती हि के. के. वाघ शिक्षा संस्थेचे माजी अध्यक्ष्य कै. बाळासाहेब वाघ आणि के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यलाचे प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर यांनी दि. १९ ऑगस्ट २०२० रोजी केलेल्या प्रतिन्यापत्राचे उल्लंघन आहे.

वरील सर्व बाबी ह्या संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, संस्थेचे सचिव कल्लापा बंदी आणि महाविदयालयाचे प्राचार्ये डॉ केशव नांदुरकर यांच्या निदर्शनास आणून देऊन पण हे सर्वजन गप्प आहे. त्याविरोधात लवकरच दाद मागण्यात येणार आहे असे प्रा. संदीप गुंजाळ व प्रा. मंगेश खालकर यांनी सांगितले. सदरच्या संस्थेच्या अशा अनेक बाबी असून त्या क्रमशः आपल्या समोर येतील. असाच अंधाधुंद कारभार चालू राहिल्यास संस्थेने कष्टाने मिळवलेला दर्जा आणि विश्वास लवकरच ढासळेल. तसेच माघील अनेक वर्षांपासून अभियांत्रिकी महाविद्यालय हे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क मध्ये जागा मिळवण्यात अपयशी ठरले आहे, हे संस्थची गुणवत्ता ढासळण्याचे प्रतिक आहे.

प्रा. गुंजाळ यांच्या फेसबुक पेजची लिंक
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0cvS1mwsMHYQKvWidTejcCPphcGtgtbHm7u3Vex3gr8AYHs2mvVqRSGMiDCF2jMBCl&id=1813215149

KK Wagh Education Society Professor Allegation Illegal Work


Previous Post

बायजूज कंपनीचा मोठा निर्णय; तब्बल एवढ्या कर्मचाऱ्यांना नारळ देणार

Next Post

धक्कादायक! अभिनेत्रीने एका मागोमाग सर्व कपडे काढले; व्हिडिओ इन्स्टाग्रामवर केला शेअर

Next Post

धक्कादायक! अभिनेत्रीने एका मागोमाग सर्व कपडे काढले; व्हिडिओ इन्स्टाग्रामवर केला शेअर

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group