इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘कौन बनेगा करोडपती’ या शो मध्ये सहभागी होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यात जर तुम्हाला करोडपती होण्याची संधी मिळाली तर ती कोणाला नको असते. म्हणूनच करोडपती होण्याचं स्वप्न घेऊन देशभरातील स्पर्धक ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात सहभागी होतात. एवढी मोठी रक्कम जिंकणं प्रत्येकाला शक्य नसलं तरी लाखोंमध्ये पैसे जिंकून अनेकांनी आपली स्वप्नं पूर्ण केली आहेत. आता या शो च्या १४ व्या पर्वाला पहिला करोडपती मिळाला आहे. कोल्हापूरने हा बहुमान पटकावला आहे.
https://twitter.com/SonyTV/status/1571008266511216642?s=20&t=NtH35UeJRhs88civ9-j-xw
सोनी टीव्हीवरील लोकप्रिय रिऍलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ १४ व्या सीझनला पहिला करोडपती मिळाला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापुरात राहणाऱ्या कविता चावला यांनी शोमध्ये एक कोटी रुपये जिंकले आहेत. मात्र, कविता यांनी ७ कोटी रुपये जिंकले की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कविता यांनी याआधीही ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये भाग घेतला होता. मात्र हॉटसीटवर बसण्याची संधी त्यांना मिळू शकली नव्हती. तरीही हार न मानता त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले.
https://twitter.com/SonyTV/status/1571042521089613824?s=20&t=NtH35UeJRhs88civ9-j-xw
४५ वर्षीय कविता यांचे शिक्षण अवघे १२वी उत्तीर्ण एवढेच आहे. एक कोटी रुपये जिंकायचं ध्येय आपल्यासमोर ठेवलं होतं. या शोचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनीसुद्धा त्यांच्या आत्मविश्वासाची खूप प्रशंसा केल्याची चर्चा आहे. मुलगा विवेकसोबत कविता या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांचा हा खास एपिसोड येत्या सोमवारी आणि मंगळवारी सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. गेल्या सिझनपासून ‘कौन बनेगा करोडपती’च्या शोमध्ये महिलांचाच बोलबाला दिसतो आहे.
https://twitter.com/SonyTV/status/1571057620449992706?s=20&t=NtH35UeJRhs88civ9-j-xw
गेल्या दोन सिझनमध्ये काही महिला करोडपती झाल्या. याचा आनंद अमिताभ बच्चन यांनीसुद्धा साजरा केला होता. करोडपती होण्याचं स्वप्न घेऊन देशभरातील स्पर्धक या शोमध्ये सहभागी होतात. एवढी मोठी रक्कम जिंकणं प्रत्येकाला शक्य नसलं तरी लाखोंमध्ये पैसे जिंकून अनेकांनी आपली स्वप्नं पूर्ण केली आहेत.
गेल्या सिझनमध्ये केबीसीच्या नियमांतर्गत एक कोटी जिंकल्यानंतर ७ कोटींच्या प्रश्नाला चुकीचं उत्तर दिल्यास स्पर्धकांना फक्त ३ लाख रुपये मिळत होते. यामुळेच ७ कोटींच्या प्रश्नाला एकही स्पर्धक उत्तर देत नव्हता. मात्र आता या सिझनमध्ये ७ कोटींच्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिल्यास स्पर्धकांना ७५ लाख रुपये मिळणार आहेत. निर्मात्यांना आशा आहे की यामुळे काही स्पर्धक तरी ७ कोटींच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. मात्र या प्रश्नासाठी कोणतीही लाईफलाइन वापरण्याची परवानगी नाही.
KBC 14 Kolhapur Women this Seasons 1st Carorepati
Entertainment