साप्ताहिक राशिभविष्य – १८ ते २५ सप्टेंबर २०२२
मेष – या सप्ताहात विशेष महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होईल. त्यांचे मार्गदर्शन लाभेल. त्यादृष्टीने आपणही गृहपाठ करून अशा माननीय व्यक्तीं सोबत योग्य त्या शब्दात संवाद साधावा…..
वृषभ – विविध प्रकारच्या मर्यादांची जाणीव करून देणारा सप्ताह आहे. त्यामध्ये योग्य ते शब्द वापरण्याची मर्यादा, योग्य त्या भावना व्यक्त करण्याची, योग्य तेथे व्यक्त होण्याची व योग्य ते मौन पाळण्याची मर्यादा आपण सांभाळली पाहिजे…..
मिथुन – यावेळी खर्चावर नियंत्रण ठेवणे जिकरीचे होणार आहे. विविध प्रकारचे खर्च अत्यावश्यक वाटल्याने त्यावर योग्य त्या पद्धतीने नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल…..
कर्क – व्यवसाय तसेच नोकरीत या शब्दात अचानक वाढीव जबाबदाऱ्या स्वीकारावे लागतील. त्या सकारात्मक पद्धतीने स्वीकाराव्या. त्यातून आपणास नवीन अनुभव मिळतील……
सिंह – विविध प्रकारच्या अपेक्षा या सप्ताहात कमी-अधिक प्रमाणात पूर्ण होतील. काही अपेक्षा निरर्थक ठरतील तर काही पूर्ण होतील. यावेळी अपेक्षाभंगाचे दुःख न बाळगता अनुभव लक्षात ठेवावा…..
कन्या – विविध प्रकारची सरकार दरबारी कामे एकाच वेळी या सप्ताहात आल्याने ती पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे लागेल…..
तूळ – बरेच दिवस पाठपुरावा केलेले काम या सप्ताहात मार्गी लागेल. नोकरदारांना बढतीचे योग. व्यवसायिकांना मोठ्या व्यवसाय संधी लाभतील……
वृश्चिक – जुन्या गुंतवणुकीचा फायदा यावेळी दिसू लागेल. विशेषतः स्थावर स्वरूपातील गुंतवणूक यामध्ये अनुभव येईल. पुर्नगुंतवणूक करण्याची संधी देखील साधता येईल….
धनु – नियमित कामाच्या ठिकाणच्या नवीन जबाबदाऱ्या, त्याचे प्लॅनिंग यामध्ये हा सप्ताह व्यस्त राहील. आपले पूर्वानुभव कामी येतील…..
मकर – शारीरिक विशेषतः हाडांच्या समस्यांकडे दुर्लक्ष नको. युवा वर्गाच्या समस्या मार्गी लागतील…..
कुंभ – मतभेदाचे प्रसंग या सप्ताहात मोठ्या चतुराईने टाळावे. आपल्याबद्दल गैरसमज होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी……
मीन – नवीन सर्व प्रकारची खरेदी, गुंतवणूक, दीर्घकालीन आर्थिक योजना याबाबत या सप्ताहात विशेष अनुभव येईल……
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे……
वास्तु विषयक अतिशय महत्त्वाच्या टिप्सचा सेट घरपोच मिळेल भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत वास्तु टिप्स सेट च्या अधिक माहिती साठी व्हाट्सअप ९३७३९१३४८४ थोडेच सेट शिल्लक