अंधार सारून प्रकाशाचा वेध घेणारी
उर्जस्वल कवयित्री : प्रा.डॉ.प्रतिभा जाधव
ज्यांची कविता सामाजिक समतेचा हुंकार ध्वनित करताना दिसते. प्रामुख्याने स्त्रीमुक्तीचा आवाज ज्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी दिसतो. सहज सोप्या शब्दात मनाचे आक्रंदन व्यक्त करणं, हे ज्यांच्या कवितेचं खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यांची कविता माणसाच्या जगण्याच्या विविध स्तरातील अंत:स्वर आहे. ज्या वेदनेला अर्थ देणारी आशयघन कविता त्या सातत्याने लिहितात. आपल्या कवितेतून स्त्रीसंवेदना व्यक्त करतात. त्या म्हणजे कवयित्री प्रा.डॉ.प्रतिभा जाधव.

(लेखक ज्येष्ठ कवी आहेत)
मो. 9422757523